सत्तावीस वर्षनी एकत्र आले वर्गमित्र,जुन्या आठवणींना मिळाला उजाळा

 सत्तावीस वर्षनी एकत्र आले वर्गमित्र,जुन्या आठवणींना  मिळाला उजाळा



पाताळगंगा न्यूज :  दिनेश पाटील
साजगांव : १६ फेब्रुवारी,

             पाताळगंगा विद्यालय होनाड शाळेतील विध्यार्थ्यांची दहावीची बॅच सत्तावीस वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र आल्याने विध्यार्थ्यानी आंनद व्यक्त करीत मोठ्या उत्साहात आपल गेट टुगेदर  हा कार्यक्रम  केले. 
            खालापूर तालुक्यातील होनाड परिसरात कित्येक वर्ष पातळगंगा विद्यालय होनाड ही शाळा कार्यरत आहे.अनेक विध्यार्थी या शाळेतुन घडले आहेत.यापैकी १९९७ बॅच मात्र आठवणीत राहिली.त्या बॅचच्या दहावीच्या निकाळानंतर शाळेला अनुदान मिळण्यास सुरु झाली होती.तीच बॅच पुन्हा एकदा तब्बल सत्तावीस वर्षांनी एकत्र आले.पेण तालुक्यातील वाकृल गावाशे जारील फार्महाऊसवर गेटटुगेदरचे आयोजन करण्यात आले.
             यावेळी सकाळपासून सर्व वर्गमित्र ठरलेल्या ठिकाणी पोहचले.आपण केव्हा त्या कार्यक्रम स्थळी पोहचतोय अशी ओढ या मित्रांना लागली होती.यावेळी पुणे, ठाणे,कल्याण अश्या दूरच्या ठिकाणांहून वर्गमित्र आले होते.सुरवातीला सर्व एकत्र आल्यानंतर खूप भावुक झाले होते.अनेक वर्षानंतर एकत्र आल्याने प्रत्येकाने एकामेकांनी विचारांची देवाण - घेवाण केली. हास्य ,विनोद सुरु झाले.आणि पुन्हा एकदा शाळेतील वातावरण निर्माण झाले होते.यावेळी अनेकांनी गीत गायले तर अनेकांनी आयुष्यातील अनुभव सांगितलं.या बॅच चा असलेला विद्यार्थी  दिनेश सुर्वे याचा कोरोना काळात निधन झाले होते त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.


Post a Comment

0 Comments

एक्झॉनमोबिल कंपनी कडून विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्य वाटप