व्यवस्थापक सक्षम निर्णय घेत नसल्यामुळे आंदोलन सुरुच,मा.आमदार मनोहर भोईर यांनी घेतली कामगारांची भेट
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
पौद : १७ फेब्रुवारी,
पौद गावानजिक आसलेला कारखान्यातील कामगारांना कामावरुन कमी करण्यात येत असल्यामुळे कॉन्फिडन्स पेट्रोलियन इंडिया लीमिटेड, गेट जवळ तंबू ठोकून साखळी उपोषण सुरु केले आहे आज तिसरा दिवस असतांना,उरण मतदार चे मा.आमदार मनोहर भोईर यांनी कामगारांची भेट घेतली.यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे पदाधिकारी,सरपंच,उप सरपंच,सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही तुमच्या पाठीशी सदैव असून आपणांस न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असे अश्वासन यावेळी कामगारांस देण्यात आले.
गेले तीन दिवस गेट च्या बाहेर तंबू ठोकून साखळी उपोषण सुरु असून,आपला निषेध व्यक्त करित ढिय्या आंदोलन सुरु आहे. मात्र व्यवस्थापक कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नसल्याने कामगारांचा हा तिडा दिवसेंदिवस हा आधिक गुंतागुंतीचा होत चालला आहे.यामुळे कामगारांच्या आरोग्या वरती विपरित परिणाम होण्यांची दाट शक्यता वर्तवली जात आहे. रात्रीच्या खुप थंडी पडत असल्याने कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मात्र व्यवस्थापक यांना काहिच सोयर सुताक नसल्यांचे दिसून येत आहे.
कॉन्फिडन्स पेट्रोलियन इंडिया लीमिटेड या कारखान्यात कोकण श्रमिक संघ, संलग्र हिंद मजदूर सभा महाराष्ट्र कौन्सिल यांची युनियन असून जो पर्यंत कामगारंच्या मागण्या पुर्ण होत नाही.तो पर्यंत आंदोलन असेच चालू राहील असा इशारा श्रुतीताई श्याम म्हात्रे यांनी व्यवस्थापक यांस दिला आहे.मात्र व्यवस्थापक यांचे आडमोठे धोरणमुळे निर्णय घेण्यास असक्षम झाल्याने कामगारांनी साखळी उपोषणांचे मार्ग अवलंबला असल्यांचे युनियन कामगार प्रमोद काठावले, रणधीर पाटील,संतोष भोईर,संदीप काठवले,दत्तात्रेय गारुडे,अरुण भोईर,रोहिणी टेंबे,दिपक जाधव यांनी सांगितले.
चौकट
व्यवस्थापक यांना वठणीवर आण्यासाठी पुन्हा कामगारांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे.जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत काम बंद राहण्याचा,तसेच व्यवस्थापकांचे असभ्य वर्तन असून महिला कामगारांस आरेरावीची भाषा बोलत असल्यामुळे,संतप्त भावना व्यक्त केली.
कॉन्फिडन्स पेट्रोलियन कामगार - प्रमोद काठावले
0 Comments