नारंगी - स्वाली येथे रंगणार खालापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचा थरार

 नारंगी - स्वाली येथे रंगणार खालापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचा थरार



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
सावरोली  : १६ फेब्रुवारी,

            खालापूर तालुक्यामधील नारंगी - स्वाली येथे तालुक्यातील शिवजयंती निमित्त सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचा थरार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या सौजन्यातून १८  फेब्रूवारी रोजी, सकाली ९  ते सायंकाळी ६. ३०  वाजेपर्यंत रंगणार आहे. या शर्यतीमध्ये ३  मोटारसायकलींच्या बक्षीसांचा धुरळा उडणार आहे.या मोठ्या बैलगाडा शर्यतीची तयारी अंतिम टप्प्यात असून कशा प्रकारे नियोजन असेल कोण कोण उपस्थित राहणार प्रेक्षकांची कशी काळजी घेणार ही सर्व माहिती तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे व आयोजक माजी सरपंच दिनेश घाडगे व शिरवली चे सरपंच महेश पाटील व अन्य सहकारी वर्गाने पत्रकारांशी संवाद साधताना  दिली आहे.                                                               न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्यानंतर राज्यातील विविध भागात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात असताना शिवसेना उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या सौजन्यातून तसेच जांभिवलीचे माजी सरपंच दिनेश घाडगे व सरपंच ग्रुप यांच्या पुढाकारातून आणि भारतीय बैलगाडा संघटना खालापूर - रायगड भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन तालुक्यातील नारंगी - स्वाली येथील खालापुर केसरी मैदानात करण्यात आले आहे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे आयोजक दिनेश घाडगे यांनी सांगितले आहे.
            तर यावेळी युवासेनाप्रमुख तथा शिवसेना नेते आमदार आदित्य साहेब ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, रायगड जिल्हाप्रमुख .मनोहर भोईर, मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे,पाटील  रायगड जिल्हा महिला संघटिका सुवर्णाताई जोशी यासह अन्य  प्रमुख मान्यवर या बैलगाडा शर्यतीप्रसंगी उपस्थित राहणार असल्यांचे समजते.

Post a Comment

0 Comments

विकास कामाच्या जोरावर महेश बालदि पुन्हा आमदार होणार मा.सरपंच माजगांव- गोपीनाथ जाधव