दक्षता सेवा फाउंडेशनच्या वतीने ,खोपोली पोलीस ठाण्यातील पोलीस भगिनींसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन...

 दक्षता सेवा फाउंडेशनच्या वतीने ,खोपोली पोलीस ठाण्यातील पोलीस भगिनींसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन...




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
खालापूर : १७ फेब्रुवारी

             रथसप्तमीच्या मूहूर्तावर  दक्षता सेवा फाउंडेशन रायगड जिल्ह्याच्या वतीने खोपोली पोलिस ठाण्यातील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात  आले.या कार्यक्रमाची सुरुवात नव्याने हजर झालेल्या महिला पोलीस निरीक्षक, पूजा चव्हाण यांच्या हस्ते माँसाहेब जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून.सर्व महिलांना हळदीकुंकू देऊन वाण आणि अल्पआहार देण्यात आला.
               त्याच बरोबर पोलिस महिलांना विरंगुळा व आनंद मिळावा यासाठी मनोरंजन खेळ खेळण्यांत आले. या खेळात प्रथम क्रमांक वैशाली कातुरडे,द्वितीय क्रमांक पोलीस निरीक्षक, पूजा चव्हाण, तर तृतीय क्रमांक दिव्या देशमुख यांनी पटकावला.उत्तेजनार्थ ऋषी गौतमी गायकवाड यांचा आला. तसेच उपस्थित महिलांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच पोलिस कर्मचारी यांची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण मुलांना बक्षिसे देण्यात आले.
              अल्पआहार दिनेश महाडिक,यांनी दिले.  हळदीकुंकू समारंभाला लागणारे साहित्य सदस्या, भारती शहा यांनी दिले.मुलांची व खेळाच्या बक्षिसांचा खर्च कविता खोपकर, संस्थापक उपाध्यक्षा, महाराष्ट्र यांनी केला.या संस्थेच्या वतीने हळदीकुंकू वाणांचा खर्च करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रजनी म्हामूणकर, रायगड जिल्हा सचिव, भारती शहा, कविता खोपकर, केतन खोपकर, रमाकांत म्हामूणकर यांनी विशेष प्रयत्न केले. 
               या कार्यक्रमास वर्षा मोरे, भारती पाटील, संगीता पाटील, राजश्री पाटील, किशोरी चेऊलकर, संगीता विचारे, हेमलता कर्णूक , करूणा सावंत उपस्थित होत्या. मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक,शितल राऊत यांनी कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल दक्षता सेवा फाउंडेशनच्या वतीने कविता खोपकर यांनी आभार मानले. आणि विशेष म्हणजे मा. पूजा चव्हाण, पोलिस निरीक्षक,प्रांजलीताई पाटील आणि सर्वच महिलांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.


Post a Comment

0 Comments

विकास कामाच्या जोरावर महेश बालदि पुन्हा आमदार होणार मा.सरपंच माजगांव- गोपीनाथ जाधव