खालापूरात युवती सेनेच्या हळदी कुंकू समारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद,महिलांच्या सन्मानासाठी रंगला मानाच्या पैठणीचा खेळ

 खालापूरात युवती सेनेच्या हळदी कुंकू समारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद,महिलांच्या सन्मानासाठी रंगला मानाच्या पैठणीचा खेळ 



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
खालापूर : २१ फेब्रुवारी,
              
             दिवस मानाचा, महिलांच्या सन्मानाचा अस्मितेसाठीच शिवसेना (शिंदे गट) युवती सेनेच्या वतीने खालापूरात भव्य हळदी - कुंकू कार्यक्रमाला महिलांनी मोठी गर्दी केली होती. महिलांसाठी मानाच्या पैठणीचा खेळ आयोजित करण्यात आला होता. मानाच्या पैठणीच्या खेळात महिला उत्स्फुर्तपणे सहभागी झाल्या होत्या, यादरम्यान लकी ड्राँ कूपनच्या माध्यमातून चांदीच्या नथीचे वाटप करण्यात आले.
                   आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (शिंदे गट) युवती सेना तालुका अधिकारी अर्चना लाड यांनी तांबाटी ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटागणांत भव्य हळदी - कुंकू समारंभ आणि मानाच्या पैठणीचा खेळ आयोजित करण्यात आलेला. या कार्यक्रमासाठी कर्जत खालापूर विधानसभा संपर्कप्रमुख पंकज पाटील, तालुका प्रमुख तांबाटीचे संदेश पाटील, सरपंच अविनाश आमले, कर्जत शहरप्रमुख सुरेखा शितोळे, संपर्क संघटक सायली शहासणे, उपजिल्हाप्रमुख निलम चोरगे, तालुकाप्रमुख रेश्मा आंग्रे, युवती सेना उपजिल्हाप्रमुख पूजा देशमुख, शहरप्रमूख काव्या खोपकर, आरती दळवी, नगराध्यक्ष रेश्मा मोडवे, अरुणा सावंत, शितल पाटील, करूना कदम, करिष्मा भासे, अर्चना पाटील, मनीषा थोरवे, सायली मोरे, काजल पाटील, मिनल सावंत कामिनी पांडवे, दर्शना गोरे, प्राजक्ता पाटील, सरिता पाटील, संतोष उतेकर, रोहित लाड, ज्ञानेश्वर सावंत, सूरज जाधव उपस्थित होते.
              हळदी मधून  आरोग्य राखणे आणि कूंकुवातून सामर्थ्य वाढत असल्याचे सरपंच यांनी सांगत पक्ष कोणताही असो महिला सक्षिमीकरणासाठी हवी मदत करणार करू असेही सरपंच आमले म्हणाले.महिला सक्षम झाल्यामुळेच आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत. पंतप्रधान मोदी यांनी तिजोरीच्या चाव्या महिलेच्या हाती दिल्याचे कौतुक कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील यांनी बोलताना देत युवती तालुका अधिकारी अर्चना लाड यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक पाटील यांनी केले.
              विज्ञान आणि आध्यात्मक यांची सांगड घालत हसत खेळत माहिती देणारा एक आगळावेगळा टॉक शो मधील प्रथम क्रमांक मानाची पैठणी, द्वितीय क्रमांक सोन्याची नथ, तृतीय क्रमांक चांदीच नाणं, लकी ड्रॉ मध्ये विजेत्या महिलांना सोन्याचे, चांदीचे, आकर्षक बक्षिसे देण्यात आली असुन उपस्थित मान्यवर आणि महिलांचे आभार आयोजक युवती सेना तालुका अधिकारी अर्चना लाड यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments

संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर