वडगांव येथे आई गावदेवी भवानी माता उत्सव,हजारो भक्तांनी घेतले दर्शन,वेशभषा करून भारतीय संस्कृतींची ओळख

 वडगांव येथे आई गावदेवी भवानी माता उत्सव,हजारो भक्तांनी घेतले दर्शन,वेशभषा करून भारतीय संस्कृतींची ओळख  




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
वडगांव  : २१ फेब्रुवारी,
 
                वडगांव गावामध्ये असलेल्या आई गावदेवी भवानी मातेची मुर्ती ची दोन वर्षी पुर्वी  प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली होती.ही मुर्ती प्राचिन असल्यामुळे या ठिकाणी भव्य दिव्य असा मंदिर बांधून या ठिकाणी या वर्षी द्वितीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.विशेष म्हणजे सलग दोन दिवस हा कार्यक्रम सुरु असून या मध्ये धार्मिक विधी समवेत महाप्रसाद चा लाभ आलेल्या भक्तगणांने घेतला.
         

  गेले दोन दिवस सुरु असलेल्या उत्सवात विविध कार्यक्रमाची रेलचेल असून या ठिकाणी जणू यात्रेसारखे स्वरूप प्राप्त झाले होते.या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध वेशभूषा करून भारतीय संस्कृतींचे दर्शन या ठिकाणी पाहावयांस मिळाले.त्याच बरोबर या ठिकाणी करमणुकीचे साहित्य समवेत,विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.सामुदायिक काकडा,श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचन,भजन,तसेच देवीचे गाणी समवेत पुण्यवाचन,ब्रम्हादी मंडळ ,मुख्यदेवता नवग्रह स्थापन,पुजन हवन,देवीची पालखी संपूर्ण गावामध्ये फिरविण्यात आली.यावेळी या परिसरातील शेकडो वारकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
                 

             आज सायंकाळी ज्ञानाई हरिपाठ महिला मंडळ आसरोटी यांनी केले.यावेळी गायनाचार्य महाराष्ट्राचा बुलंद आवाज कैलास महाराज पवार (  मंगळवेढा पंढरपूर ) या कार्यक्रमाचे सांगता ह.भ.प.नागेश्वरी ताई झाडे देवाची आळंदि यांनी उत्तम असे कीर्तन करुन जमलेल्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.आणी ग्रामस्थ मंडळ वडगांव यांच्या माध्यमातून आज या कार्यक्रमांची सांगता होणार आहे.

Post a Comment

0 Comments

बांधकामंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त चौकमध्ये रक्तदान शिबिर, सरपंच रितू ठोंबरे यांनी केले रक्तदान