भारतीय जनता पक्ष खालापूर मंडळातील नवनियुक्त पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहीर.

 भारतीय जनता पक्ष खालापूर मंडळातील नवनियुक्त पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहीर.




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
खालापूर : ८जानेवारी


             भारतीय जनता पक्ष दिवसेंदिवस वाढत असतांना,अनेकांच्या खाद्यावर विविध जबाबदारी देण्यात आल्यांचे पहावयांस मिळत आहे.यामुळे तरुण वर्गांचा विश्वास आणी नवनियुक्त पदाधिकारी,यांच्या नियुक्ती करण्यात येत असल्यामुळे त्यांच्या चे-यावर समाधांनांचे भाव पहावयांस मिळाले.कार्यकर्त्यांचा होत असलेला प्रवेश व येणाऱ्या नवीन कर्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून आज उत्तर रायगड जिला अध्यक्ष भाजपा अविनाश कोळी, मा. आमदार सुरेश भाऊ लाड,कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे,माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील, जिल्हा सरचिटणीस भाजपा दिपक बेहरे, रायगड जिल्हा मन की बात संयोजक प्रल्हाद केणी, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव, खालापूर मंडळ अध्यक्ष भाजपा प्रवीण मोरे, युवा मोर्चा खालापूर तालुका अध्यक्ष नागेश पाटील, संदीप पाटील यांच्या उपस्थितीत 
                   अमर शंकर मानकवले यांची युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी, दत्तात्रय पांडुरंग पुरी यांची माथाडी कामगार तालुका अध्यक्षपदी, अनिल जाधव भाजपा खालापूर तालुका उपाध्यक्षपदी, दिनेश गंगाराम जंगम ओबीसी सेल खालापूर तालुका उपाध्यक्षपदी,नामदेव सकपाळ साजगाव जि प सरचिटणीसपदी, लव्हेश कर्नूक कलोते पंचायत समिती विभाग अध्यक्षपदी, ज्ञानेश्वर पारंगे सावरोली पंचायत समिती विभाग अध्यक्षपदी, अभि कदम जिल्हा वॉरिअर जिल्हा सहसंयोजकपदी, अक्षय जाधव युवा वॉरिअर खालापूर तालुका संयोजकपदी, 
                 तेजस घारे युवा वॉरिअर खालापूर तालुका सहसंयोजकपदी, केतन महाडिक खालापूर तालुका कार्यकारणी सदस्य युवा मोर्चा तर राजेश नारायण पाटील सारसन बूथ अध्यक्षपदी निवड करण्यात आली.ह्यावेळी मृणाल खेडकर मावळ लोकसभा समन्वयक महिला मोर्चा, वीनिता घुमरे जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चा,निकिता हेलंडे सरचिटणीस महिला मोर्चा रायगड जिल्हा,सुजाताताई दळवी खालापूर तालुका अध्यक्ष महिला मोर्चा,सरस्वती चौधरी कर्जत तालुका उपाध्यक्ष महिला मोर्चा,श्वेता प्रवीण मनवे मा. उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, कर्जत खालापूर विधानसभा युवा मोर्चा संयोजक प्रसाद पाटील,                                                                                                                                                          अध्यात्मिक आघाडी जिल्हा संयोजक काशिनाथ पारठे, खालापूर तालुका उपाध्यक्ष आबा देशमुख, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष प्रसाद देशमुख, खालापूर शहर अध्यक्ष दिपक जगताप, विकास रसाळ, जयेंद्र पाटील,प्रवीण मनवे, सुनील सुखदरे,जगदीश आगीवले भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या सह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर