घोडीवली येथे त्रिदिनी दत्त जयंती निमीत्ताने काकड आरतीस प्रारंभ

 घोडीवली येथे त्रिदिनी दत्त जयंती निमीत्ताने काकड आरतीस प्रारंभ




माय मराठी न्युज :   नवज्योत पिंगळे 
खालापूर :  ५ डिसेंबर,

           खालापूर तालुक्यातील घोडीवली येथे गेल्या ४३  वर्षाची परंपरा कायम राखत याठिकाणी त्रिदिनी दत्तराज जयंती उत्सव सोहळा रायगड भुषण ह.भ.प.तानाजी महाराज कर्णुक यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली १२  डिसेंबर ते १५ डिसेंबर या काळावधीत साजरा करण्यात येणार आहे . या निमित्तांने कलश पूजन, विणा पूजन, काकड आरती, प्रवचन, हरिपाठ, किर्तन, जागर भजन असे धार्मिक कार्यक्रम पार पडत असल्यामुळे,याप्रसंगी नामवंत प्रवचनकार व कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदान मिळत असते.या निमित्ताने  दीप उत्सवाचा भव्य दिव्य कार्यकम दुसऱ्या दिवशी संपन्न होत असते. 
            गेली अनेक वर्षा पासून  दत्त जयंती उत्सव साजरा केला जात असल्यामुळे,मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून दत्त जयंती होईपर्यंत गावातील महिला जेष्ठ तरुण वर्ग काकड आरती साठी उपस्थिती असल्यांचे पहावयांस मिळत असतात.हा कार्यक्रम उत्तम पणे होण्यांसाठी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ - महिला वर्ग - तरुणाई व वारकरी संप्रदायातील मंडळी नेहमीच उपस्थित असल्यांचे पहावयांस मिळते. 
               दत्त जयंती हा एक सांप्रदायिक जमोत्सव. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. घोडीवली येथे गेले ४२ वर्ष दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करीत असून या वर्षाचे ४३ वे वर्ष सुरु आहे. 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर