शाखाप्रमुख जितेंद्र कर्णूक यांच्या शिवसेना शाखेचा शुभारंभ

 शाखाप्रमुख जितेंद्र कर्णूक यांच्या शिवसेना शाखेचा शुभारंभ जिल्हाप्रमुख संतोषशेठ भोईर व कर्जत पंचायत समितीचे उपसभापती मनोहर थोरवे यांच्या हस्ते,जणतेच्या सोबत तरुणाच्या रोजगाराचे प्रश्न सोडविणार जितेंद्र कर्णूक यांचा शब्द








पाताळगंगा न्यूज : शिवाजी जाधव 
खोपोली : २५  फेब्रुवारी,

               सारसन - रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात सारसन परिरस हा औद्योगिक वसाहत म्हणून ओळखला जातो. याठिकाणी अनेक मोठ मोठ्या कंपन्या असून मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग कामाला असून काही तरुण रोजगाराच्या शोधात असतात. याच मध्यवर्ती ठिकाणी शिवसेना सारसन शाखाप्रमुख जितेंद्र कर्णूक यानी आपल्या कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाप्रमुख संतोष भोईर व कर्जत पंचायत समितीचे उपसभापती मनोहर थोरवे यांच्या हस्ते करून शुभारंभ करण्यात आला.    

                                             या ठिकाणी उपस्थित  जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी बोलताना सदरील शिवसेना कार्यालयातून नागरिकांचे सर्व प्रश्न सोडविले याबाबत उपस्थित नागरिकांना आश्वासन देत जितेंद्र कर्णूक यांचे अभिनंदन केले.. तसेच जनते सोबत तरुणाच्या रोजगाराचे प्रश्न सोडविणारच पण पक्ष वाढीसाठी सुधा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे जितेंद्र कर्णूक यांनी जिल्हाप्रमुख संतोष भोईर व उपसभापती मनोहर थोरवे यांना शब्द दिला.
         

 यावेळी दिपक कडव , संजय पाटील , महेश कर्णूक , राजू कडव , रविंद्र कर्णूक , नरेश कर्णूक , उपशाखा प्रमुख केतन घरत , युवा सेना अधिकारी अमोल जाधव , अक्षय पाटील , पप्पू पुरी , निखिल कर्णूक , प्रदिप कर्णूक , सोमेश कर्णूक , राज जाधव , प्रवीण कर्णूक , रोहीत जाधव , रोशन कदम व सारसन गावातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर