खालापूर शहरातील तलावा झाला स्वच्छ ,संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनतर्फे ‘प्रोजे
क्ट अमृत यांचा पुढाकार ,स्वच्छ जल, स्वच्छ मन अभियान
पाताळगंगा न्यूज : नवज्योत पिंगळे
खालापूर : २६ फेब्रुवारी,
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेखाली रविवारी सकाळी ८ : ०० वाजता ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ परियोजनेच्या द्वितिय टप्प्याचा शुभारंभ यमुना नदीचा छठ घाट, आई.टी.ओ. दिल्ली येथून करण्यात आला. बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या दिव्य शिकवणूकीच्या प्रेरणेतून साकारलेली ही परियोजना भारतवर्षातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील १ हजार ५३३ ठिकाणी एकाच वेळी राबविण्यात आली ज्यामध्ये ११ लाखाहून अधिक स्वयंसेवकांनी भाग घेतला.
या प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल, स्वच्छ मन ही परियोजना खालापूर शहरातील तलाव येथे राबविण्यात आली. या कार्यक्रमामध्ये खोपोली सेक्टर संयोजक कुलबहादूर कुवर , सावरोली ब्रांच मुखी राजेश बैलमारे तिवरे ब्रांच मुखी बबन केदारी खोपोली सेवादल संचालक तसेच सावरोली सेवादल अधिकारी निरंकारी सेवादल अन्य निरंकारी भक्तगणांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. या वेळी खाला पूर नगरपंचायत उपनगर अध्यक्ष संतोष जंगम, नगरसेवक राजेश पारठे प्रतिष्ठित नागरीक व जनसामान्यांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले
दिल्ली येथे ‘प्रोजेक्ट अमृत’च्या द्वितिय टप्प्याच्या आयोजन प्रसंगी निरंकारी राजपिता रमितजी यांनी सद्गुरु माताजींच्या आशीर्वचनापूर्वी आपल्या संबोधनामध्ये म्हटले, की बाबा हरदेवसिंहजी यांनी आपल्या जीवनात आम्हाला हीच प्रेरणा दिली, की सेवा ही निष्काम भावनेनेच व्हायला हवी.त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रशंसेची इच्छा नसावी. आपण स्वत:चे आंतरिक परिवर्तन घडवून आणण्याकडे लक्ष केंद्रीत केले, तर त्यातून समाज व जगाचे परिवर्तन घडून येऊ शकेल.खरं तर स्वच्छ आणि निर्मळ मनातूनच सात्विक परिवर्तनाचा
0 Comments