साजगाव जिल्हा परिषद वार्ड मधील उसरोली व भोकरपाडा येथील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खालापूर : २५ फेब्रुवारी,
दिवसेंदिवस खालापूर तालुक्यातील विविध भागातील विशेष करून साजगाव जिल्हा परिषद वार्डमध्ये विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश सुरु होत असून कर्जत खालापूर विधानसभा भाजपमय करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी घेतला आहे. साजगाव जिल्हा परिषद वार्ड मध्ये तर मा.जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील यांनी सतत्याने भारतीय जनता पक्षात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा सुरु ठेवला आहे.
मा.आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून तसेच मा.जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली खालापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षात पक्ष प्रवेशाची मालिका सुरु आहे.आज उसरोळी गावातील ग्रमस्थांनी यांच्या नेतृत्वाखाली व सनी यादव जिल्हा उपाध्यक्ष, सुजाता ताई दळवी खालापूर महिला अध्यक्षा,अरुण पांडुरंग घोंगे, साजगाव जिल्हा परिषद चिटणीस, उसरोली बूथ अध्यक्ष चंद्रकांत गायकर व साजगाव जिल्हा परिषद सचिव, खरीवली पंचायत समिती अध्यक्ष गणेश डोखले यांच्या विशेष प्रयत्नाने उसरोळी,भोकरपाडा गावातील महिला रोहिणी प्रवीण पाटील,उषा पाटील ,उज्वला पाटील, .सुषमा पाटील, शालिनी पाटील, उषा दुधाने,प्रतीक्षा दुधाने, रेश्मा दुधाने, रसिका घोंगे,तसेच तुकाराम पाटील,जनार्दन पाटील,अनंता दुधाने,महादेव पाटील,लक्षमन पाटील ,प्रवीण पाटील गावातील ग्रामस्थ व महिला यांनी प्रवेश केला.
यावेळी राकेश देशमुख ,प्रविण मनवे स्वेता मानवे,प्रकाश पाटील पांडुरंग शिर्के आदी उपस्थित होते.तसेच यावेळी खालापूर तालुका महिला मोर्चा उपाध्यक्ष पदी रोहीणी प्रविण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
0 Comments