खोपोलीतील हाळ बुद्रुक येथे माऊली इंटरप्रायजेस सी.एन.जी गॅस मिळणार,वाहान चालकांस दिलासा
आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभ हस्ते सी.एन.जी गॅस पंपाचे अनावरण
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
खालापूर : २६ फेब्रुवारी,
खोपोली येथिल हाळ बुद्रुक येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सी.एन.जी पंप हे कावेरी श्रीमंत तांदळे नेरुळ नवी मुबंई व मंगल बबन सानप उल्लासनगर यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या माऊली इंटरप्रायजेस महानगर सी.एन.जी गॅस पंपाचे अनावरण आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.यावेळी शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असल्यांचे पहावयांस मिळाले.
खोपोली परिसरात एकच सी.एन.जी पंप असल्यामुळे कार,रिक्षा,सह अनेक वाहनांना गॅस भरण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. परिणामी वेळ आणी इंधनांचा खर्च वाया जात असतो. तसेच वाहनांना तांसतास पंपातील रांगात उभे राहून गॅस भरावे लागत होते.मात्र माऊली इंटरप्रायजेस महानगर सी.एन.जी गॅस पंप हा खोपोलो शहरातील झाल्याने
वाहतूकदार यांना २४ तास सेवा मिळणार असल्यामुळे वाहतूक दारांनी मोठा समाधान व्यक्त केल्याचे श्रीमंत तांदळे व बबन सानप यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.
यावेळी दिलीपराव ढोले सहव्यवस्थापीकीय संचालक सिडको, दिलीपराव गुट्टे अतिरिक्त जिल्हाधिकारी मुंबई, शरद डोके अव्वर सचिव नगर विकास मंत्रालय मुंबई, मुरलीधर मुंढे अव्वर सचिव गृहविभाग मुंबई, राम बडे उपायुक्त जी एस टी मुंबई, बबन झगरे उपायुक्त जी एस टी मुंबई, महादेव आव्हाड, कमलेश नागरे उपायुक्त जी एस टी मुंबई, सुशील कुटे झी मराठी व्यवस्थापक, दिनेश पासोरिया संचालक रिंजशी पंपाचे उद्घाटन ग्रुप ,बाळासाहेब देशमुख उद्योजक नवी मुंबई, शैलेंद्र त्रिवेदी व्यवस्थापक रिजर्व बँक,ऍड विनोद साठे सरकारी वकील, डॉ मारुती गिते, हसन जळगावकर,नसीमा हसन जळगावकर माजी नगरसेविका,अझीम मांडलेकर उपसरपंच, गुलाम हुसेन खान ,प्रसन्ना गांगण महानगर व्यवस्थापक, रेवती तिवारी उपव्यवस्थापक महानगर आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments