चावणी येथील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप,देवन्हावे येथील अभि युवा ग्रुपचा पुढाकार,लहानग्या शिवराज तावडे वाढदिवस साजरा
पाताळगंगा न्यूज : समाधान दिसले
खोपोली : २६ फेब्रुवारी,
आपण ज्या समाजात राहतो त्याचे काही देणेही लागतो, या भावनेतून देवन्हावे येथील अभि युवा ग्रुपचे ॲड.जयेश तावडे यांनी आपला मुलगा शिवराज ऋतुजा जयेश तावडे याच्या पहिल्या वाढदिवसाचे औचित्य साधत चावणी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप केल्याने तावडे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे. तर सध्या वातावरणात थंडी बऱ्यापैकी वाढत असल्याने अशा परिस्थितीमध्ये थंडीने कुडकुडणाऱ्या गोर गरिब शाळकरी मुलां - मुलींना स्वेटर वाटप केल्याने मायेची ऊब ॲड.जयेश तावडे यांनी दिल्याचे पाहायला मिळाले.
ग्रामीण भागातील शाळेतील काही विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण करण्यासाठी स्वेटर नसते. आपल्या गरीबीशी मुकाबला करताना बहुतांश आवश्यक गरजा पुर्ण न करता त्यांना शिक्षण घ्यावे लागते. थंडीपासून काकडत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गरज ओळखून देवन्हावे येथील अभि युवा ग्रुपचे ॲड.जयेश तावडे यांनी आपला मुलगा शिवराज ऋतुजा जयेश तावडे याच्या वाढदिवसाचे औचित्य खालापुर तालुक्यामधील दुर्गम भागातील चावणी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील ८० ते ८५ विद्यार्थ्यांना एक हात मदतीचा म्हणून स्वेटर वाटप करीत खाऊ ही वाटप केल्याने यावेळी आदिवासी व ठाकूर समाजाचे विद्यार्थ्यांच्या वेगळाच चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला.
याप्रसंगी अभि युवा ग्रुपचे सदस्य अँड.जयेश तावडे, रोहित नलावडे, अतिष पाटील, ओंकार वाणी, साहिल पाटील, कुणाल पाटील, सोहम पाटील, आर्यन पालकर, शैला तावडे, ऋतुजा तसेच मुख्याध्यापक मधुकर बैसाणे, शिक्षक सुधीर घोडके, रोहिणी भंडारे, शालेय समिती अध्यक्ष नितीन पाताडे, ग्रामपंचायत सदस्य रमेश चव्हाण, ग्रामस्थ गणेश चव्हाण, कृष्णा बुधलेकर, कांता उतेकर, लक्ष्मण बुधळेकर, राजू डफाळ, श्याम पाटील, नरेश पाताडे, वसंत पाटील आदी प्रमुख व मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्यध्यापक मधुकर बैसाणे सर व आभार राजू डफाळ यांनी मानले
यावेळी अँड.जयेश तावडे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, सामाजिक जीवनात जगत असताना आपण प्रत्येक जण समाजाचे काही तरी देण लागतो. तर आपण आपला वाढदिवस साजरा करताना जास्तीचा होणारा खर्च डीजे - पार्ट्या व दारू पार्ट्या, भव्य डेकोरेशन असे अनाठाई खर्च कमी करून गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून त्यांना सहकार्य करता येईल हे पाहिलं पाहिजे, हे आपल कर्तव्य आहे. याच भावनेतून आम्ही अभि युवा ग्रुप देवन्हावे अशाच पद्धतीचे वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम करीत असतो. व ते पुढे म्हणाले की, माझे भाग्य असून माझा मुलगा शिवजयंतीच्या मुहूर्तावर जन्मला व चावणी या खिंडीत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत माझा मुलगा शिवराज चं वाढदिवस सामाजिक कार्य करून साजरा करायला मिळाले, याबद्दल शाळेचे मनापासून आभार असे मत ॲड.तावडे यांनी व्यक्त केले.
0 Comments