मावळ मतदारसंघ भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता महासंमेलन

 मावळ मतदारसंघ भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता महासंमेलन

कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघातील ३०० हुन अधिक कार्यकर्त्यांनी केला भारतीय जनता पार्टीत प्रवेश





पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
खालापूर : २७ फेब्रुवारी,

             आगामी लोकसभा निवडणुकीचे भाजपने रनशिगं फुंकले असून अब की  बार  ४०० के पार चा नारा दिला आहे.महाराष्ट्रातील ४८ जागांवर भाजप व मित्र पक्ष यांना सोबत घेऊन अधिकाधिक जागा जिंकण्यांचा निर्धार भाजप करत आहे.त्याच अनुषंगाने मावळ लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समिती व विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती यांची बैठक आज कर्जत शेळके हॉल मध्ये पार पडली.
                यावेळी मा. नामदार प्रमोद सावंत मुख्यमंत्री गोवा राज्य यांनी सर्वप्रथम मावळ लोकसभा पदाधिकारी यांची आढावा बैठक घेऊन पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले            यावेळी मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख तथा आमदार प्रशांतदादा ठाकूर, माजीमंत्री बाळासाहेब हेगडे, विक्रांत पाटील प्रदेश सरचिटणीस,आमदार आश्विनीताई जगताप , शंकर जगताप,माजी खासदार अमर साबळे, अविनाश कोळी जिल्हा अध्यक्ष, बाळासाहेब पाटील मावळ लोकसभा निवडणूक क्लष्टर प्रमुख ,अतुल कालसेकर मावळ लोकसभा क्लस्टर प्रमुख,किरण, माजी आमदार सुरेशभाऊ लाड,ठाकरे कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख, सदाशिव खाडे, आमदार उमा खापरे, शरद पाटील, विठ्ठल मोरे जिल्हा उपाध्यक्ष, सनी यादव जिल्हा उपाध्यक्ष, दिपक बेहरे सरचिटणीस,रमेश मुंढे चिटणीस भाजपा रायगड जिल्हा, प्रसाद पाटील कर्जत खालापूर विधानसभा युवा मोर्चा संयोजक, मावळ लोकसभा मतदार संघातील सर्व मंडळ अध्यक्ष, बूथ अध्यक्ष, विविध सेल अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते.
              मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दौरा नियोजित असल्या कारणाने काही मोजक्या कार्यकर्त्यांचा प्रवेश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला तर कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघातील कर्जत मधील नसरापूर, धोत्रे, तिघर ठाकूरवाडी तर खालापूर मधील तोंडली, बीडखुर्द, धामणी, खोपोलीफाटा येथील कार्यकर्त्यांनी मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख तथा आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या हस्ते ३०० हुन अधिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आजच्या भाजप प्रवेशामध्ये माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अधिकाधीक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत..

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण