२८० विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप विचारे परिवारांचा स्तुत्य उपक्रम

 शिवसेना विभाग प्रमुख प्रफ्फुल (पप्पु ) विचारे व वावर्ले सरपंच प्रिया प्रफ्फुल विचारे यांच्या माध्यमातून २८०  विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप


मराठी भाषा टिकवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा टिकवणे गरजेचे आहे - तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे


पाताळगंगा न्यूज :  समाधान दिसले
खालापुर : २७ फेब्रुवारी,

             शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चौक जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख प्रफ्फुल विचारे व वावर्ले  सरपंच प्रिया प्रफ्फुल विचारे यांच्या माध्यमातून मराठी राज्यभाषा दिनाचे औचित्य साधव व अर्णव विचारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आंबेवाडी व बोरगाव ग्रामपंचायत येथील जवळपास २८० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य झळकत असल्यांचे पाहायला मिळाले. 
             यावेळी तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, पाश्चिमात्य संस्कृतीत आपली मराठी भाषा टिकवण्यासाठी जिल्हा परिषदेची शाळा टिकणे तितकेच महत्त्वाचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो आधुनिक स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी शिक्षण घेणे काळाची गरज असून शिक्षणामुळे स्वतःची उन्नती होऊन समाजात चांगले काम करण्यासाठी योग्य दिशा मिळते, असे गौरउद्गगार तालुका प्रमुख पिंगळे यांनी या उपक्रमात काढले. 
         संपर्क प्रमुख उमेश गावंड, जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, माजी पंचायत समिती सदस्या कमल भस्मा, शिवसेना विभागप्रमुख प्रफुल्ल विचारे, उपसरपंच रोशन मोरे, राहुल मोरे, मनोहर देशमुख, कानू भूरबुडा, अजिंक्य देशमुख, सुधीर मोरे, देऊ कैवारी, अतुल मोरे, अमित पारठे, आदित्य दरेकर, ऋषिकेश मोरे, सुशांत सावंत, संदेश विचारे, अर्णव प्रफुल विचारे आदि प्रमुखासह बोरगावचे मुख्याध्यापक भालोदेकर सर, निगडपट्टीचे सानप मॅडम, चिंचमालचे अशोक राठोड सर, निबारवाडीचे संदीप काईंनकर सर, टेपाचीवाडीचे शाम पवार सर, बुरूजवाडीचे भालसिंग सर, पोखरवाडीचे बडे सर, सोंडेवाडीचे राजाभाऊ चव्हाण सर, आंबेवाडीचे लवांडे सर व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            आताच्या आधुनिक स्पर्धेच्या युगात टिकविण्यासाठी शिक्षण असणे गरजेचे आहे, मात्र काहींना आर्थिक टंचाईमुळे शिक्षणापासून वंचित रहावे लागत असते. गरीब गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून सामाजिक संस्था - राजकिय पक्षाच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करीत विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहीत केले जात आहे. यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी अर्णव विचारे यास ग्रीटिंग कार्ड द्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने पाहायला मिळाले.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण