साबळे परिवार आयोजित महाआरोग्य शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद !

 साबळे परिवार आयोजित महाआरोग्य शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद  !   खोपोली: साबळे परिवार व मित्रपरिवार आयोजित महाआरोग्य शिबिराला खोपोली शहरातील विविध भागातील असंख्य नागरिकांनी भेट देऊन या शिबिराचा लाभ घेतला.




पाताळगंगा न्यूज : जयवंत माडपे 
खोपोली : २८ फेब्रुवारी,

              खोपोली शहराचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणसेठ साबळे यांच्या  पुण्यस्मरण दिनानिमित्त महाराजा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात नागरिकांची नेत्र तपासणी, कर्करोग पूर्व तपासणी, नंतर दंत चिकित्सा,व त्याप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेविका व दिवंगत लक्ष्मणसेठ साबळे यांच्या पत्नी काशीबाई साबळे व सुपुत्र यशवंत साबळे यांनी प्रतिमेस पुष्प हार घालून अभिवादन केले, त्यानंतर रक्तदान शिबिरात लक्ष्मणशेठ यांचे नातू विक्रम साबळे व  स्नुषा रेणुकाताई साबळे व सामाजिक कार्यकर्ते सुहास वजरकर यांनी रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन झाले.
                     या शिबिराला माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, माजी नगरसेवक मंगेश दळवी, मोहन अवसरमल, कैलास गायकवाड, दिलीप जाधव, चंद्राप्पा अनिवार, हेमाताई आनीवार,राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक शरद कदम, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम,कार्यवाह किशोर पाटील, क्रिकेट असोशियन चे सचिव अविनाश तावडे, कोषाध्यक्ष शंकर दळवी,प्रसाद तावडे, बाबू पोटे, तात्या रिठे,विनायक     तलवणे, साबळे परिवारातील सदस्य कमल धोत्रे यासह विविध पक्षांचे प्रमुख नेते व विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी या शिबिराला भेट देऊन आयोजक साबळे परिवारांचे कौतुक केले.
               शिबिर यशस्वीतेसाठी प्रमुख आयोजक यशवंत साबळे, शैलेश विठ्ठलानी, सुहास वझरकर, लक्ष्मण कुलकर्णी,मोंतो खान, मीतेश शहा, आदींनी परिश्रम घेतले.पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटल आणि सर्वोदय हॉस्पिटल समर्थ ब्लड बँक त्याचप्रमाणे टाटा मेमोरियल सेंटर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हे महाआरोग्य शिबिर संपन्न झाले.या शिबिरात मोफत चष्मे वाटप करण्यात आले तसेच 14 रुग्णांस मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले.रक्तदान करणाऱ्याना भेटवस्तू यशवंत साबळे यांच्या हस्ते देण्यात आले. सकाळी 10 वाजता महाराजा मंगल कार्यालयात प्रारंभ झालेल्या शिबिराचे सायंकाळी पाच वाजता समारोप झाला.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण