जैव वैद्यकीय प्रकल्प यांस विरोध,गावोगावी जनजागृती मोहीम, ४ मार्च भव्य मोर्चात होणार रुपांतर
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
माजगांव / आंबिवली २८ फेब्रुवारी,
बोरोवली या परिसरात येत असलेला एस.एम.एस. इन्व्होक्लीन प्रा. ली हा जैव वैद्यकीय प्रकल्प ( बायोमेडिकल वेस्ट ) स्थानिकांनी कडाडून विरोध दर्शविला आहे.यासाठी गावोगावी जनजागृती मोहीम राबविण्यात आली असून,या परिसरातील गृप ग्राम पंचायत यांनी हा प्रकल्प या ठिकाणी नको त्यासाठी त्यांनी पाठिंबा दर्शविला असून एक पत्र सुद्धा देण्यात आले आहे.हा प्रकल्प मानवी आरोग्यांस तसेच मुक्या प्राण्यांस घातक असल्यामुळे हा या ठिकाणी स्थापन झाल्यांस कॅन्सर,टीबी,अस्थमा,न्युमोनिया,त्वचा रोग अदि आजार धोका होण्यांचा संभव आहे.
हा प्रकल्प गोवंडी येथे असल्यामुळे येथिल स्थानिकांना त्यांचा त्रास होत असल्यामुळे हाय कोर्टाने हा प्रकल्प स्थलांतर करण्यांचे आदेश देण्यात आले.तसेच हा प्रकल्प आत्करगांव येथे येत असल्यांचे समजताच येथिल जनसुनावणी दरम्यान विरोध दर्शविल्यांने आता तो प्रकल्प बोरीवली येत असल्यामुळे येथिल ग्रामस्थांनी विरोध दर्शविला असून ४ मार्च रोजी भव्य मोर्चात रुपांतर होणार असल्यांचे समजते.काही झाले तरी या ठिकाणी हा कारखाना नको अशी भुमिका या परिसरातील ग्रामस्थांनी घेतली आहे.
तसेच हा प्रकल्प रद्द करण्यासाठी विविध ठिकाणी निवेदन देण्यात आले.या ( बायोमेडिकल वेस्ट ) प्रकल्प मध्ये मोठी हॉस्पीटल वैद्यकीय कचरा,मानवी अवयव,प्राण्यांचे अवयव,रक्त,वापरलेल्या सुया,मलमपट्टी,अदि सर्व या ठिकाणी येणार असून त्या लगतच पाताळगंगा नदि असून हेच पाणी जर नदिमध्ये गेले तर विविध आजार निर्माण होण्यांची दाट भिती व्यक्त केली जात आहे.त्याच बरोबर हेच पाण्यावर प्रक्रिया करुन दैनंदिन जिवनांत वापरले जात आहे.येणा-या पिढीला वाचविण्यासाठी ह्या प्रकल्पांस विरोध हा एकमेव लढा आहे.असल्यांचे येथिल स्थानिक म्हणत आहे.
0 Comments