राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्ताने विद्यार्थांनी साकारले प्रयोग,प्लास्टिक विरोधात जनजागृती रॅली

 राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्ताने विद्यार्थांनी साकारले प्रयोग,प्लास्टिक विरोधात जनजागृती रॅली 




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
माजगांव आंबिवली : २८ फेब्रुवारी

                        शाळेय शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांना वैज्ञानिक तत्त्वे यांचा आभ्यास असणे महत्वाचे आहे. या बाबीचा आभ्यास करुन रायगड जिल्हा परिषद शाळा माजगांव येथे आज राष्ट्रीय विज्ञान दिनांचे औचित्य साधून विविध प्रयोग साकरण्यात आले. थोर भौतिकशास्त्र पदार्थ विज्ञान नोबेल पारितोषिक विजेते पहिले भारतीय डॉ.सी.व्ही.रामण यांनी लावलेल्या शोधाची रामन इफेक्टची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.त्याच बरोबर प्लास्टिक हा पर्यावरणांस घातक असून त्यांचे दुषपरिणाम अधिक असल्यांने प्लास्टिक रॅली काढून हातात फलक घेवून पर्यावरण वाचविण्यांचा संदेश दिला.
             

                  शालेय शिक्षण घेत असतांना विद्यार्थांच्या मनावर विद्यान विषयी कुतुहल निर्माण व्हावे,,शिवाय या विषयी त्यांस ज्ञानत भर पडावी तसेच प्लास्टिक हा पर्यावरणांस घातक असून पाळीव प्राण्यांसाठी घातक असल्यामुळे विद्यार्थ्यांनी गावामधून हातात प्लास्टिक विरोधी बॅनर घेवून जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला.यावेळी हा परिसर विद्यार्थ्यांच्या घोष वाक्यांनी गर्जुन गेल्यांचे पहावयांस मिळाले.

                    या उपक्रमास राजिप शाळा माजगांव मुख्याध्यापक- किरण कवाद,शिक्षक - भुषण पिंगळे,रेखा जाधव,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य नामदेव वाघमारे,उपसरपंच राजेश पाटील,अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था पुणे यांच्या माध्यमातून बाळू पादिर यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्यास विषयी मार्गदर्शन केले.
                  
 




Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर