डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती विषयी,शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती विषयी,शेतकऱ्यांना मार्गदर्शन



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
तांबाटी : २८ फेब्रुवारी,

              डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती या विषयी शेतकरी वर्गांस माहिती उपलब्ध व्हावी या उद्दात विचारांतून गृप ग्राम पंचायत तांबाटी येथिल सभागृहात हा कार्यक्रम हाती घेण्यात आला.यावेळी नैसर्गिक शेती ही जमिनिची प्रत सुधारत असून या पासून लाभ मोठ्या प्रमाणात होत असते.आज रासायनिक खताचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे शेतीमधील गुणवत्ता ढासळत चालली आहे.मात्र शेती मधुन अधिक उत्पन्न तसेच शेतकरी वर्गांसाठी विविध योजनांची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला.
              या सेंद्रिय ( नैसर्गिक ) शेती विषयी शेतकरी वर्गांस मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील शास्त्रज्ञ डॉ. संदीप कांबळे यांनी नैसगिक शेती  बिजामृत,  दशपर्णी अर्क,  कंपोस्ट खत, अंडा टॉनिक, रोग व किडीवरचे नियंत्रण या विषयांवर शेतकऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन केले.तसेच तालुका कृषी अधिकारी खालापूर  सुनील निंबाळकर डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेची माहिती सांगितली.

               या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक श् धुमाळ यांनी केले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेविषयीची माहिती व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आत्मा बी. टी. एम.प्रज्ञा पाटील यांनी केले. प्रशिक्षणाचे नियोजन कृषी सहाय्यक  आर. बी. आंधळे यांनी केले.यावेळी तांबाटी नवनिर्वाचित सरपंच अविनाशा आमले, कृषी सहाय्यक - नितीन रांजून तस्च शेतकरी बांधव उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर