(मुंबई महानगरपालिकेत शिक्षक म्हणून रुजू) सारिका दीनेश जाधव हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

 (मुंबई महानगरपालिकेत शिक्षक म्हणून रुजू)

सारिका दीनेश जाधव हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव 



पाताळगंगा न्यूज :  हनुमंत मोरे
खोपोली ( वावोशी )  २८ फेब्रुवारी,


                आपल्या आई वडीलांच्या उपकाराची जाणीव असलेले विद्यार्थी क्रांती घडविता.हे सारिकाने मिळविलेल्या यशातून स्पष्ट होते.अशिक्षित असलेल्या सारिकाच्या पालकांनी अहोरात्र मेहनत घेऊन आपल्याला मुलीला उच्चशिक्षित केले.पुढे तिचे लग्न एका चांगल्या सुसंस्कृत कुटूंबातील दीनेश जाधव या पोलीस खात्यातील सेवा बजावणाऱ्या मुलाशी करून दिले.आता आमचे कर्तव्य संपले असे न मानता तुम्हाला वेळप्रसंगात मदतीचा हात देत राहू मात्र तुमचे प्रयत्न आम्हाला दिसायला हवेत अशी माफक अपेक्षा व्यक्त करणाऱ्या सारिकाच्या आई वडीलांसाठी आजचा दिवस आनंदाचे डोही आनंद तरंग असाच असल्याचे दिसून आला.सारिकाने लग्नानंतर संसारा सोबत शिक्षणात घेतलेल्या मेहनतीमुळे तिला मुंबई महानगरपालिकेत शिक्षकाची नोकरी मिळाली आहे.
               

आपली मनस्वी इच्छा असलेली सेवा करण्याची संधी मिळाल्याने सारिकाचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता तर तिच्या सासू,सासरे व नवऱ्यालाही तिने मिळविलेल्या यशाचा अभिमान वाटत होता.हे सर्व चित्र त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी खोपोली चे नगर सेवक कमाल पाटील ,नासिर पाटील, सेवानिवृत्त शिक्षक नारायण खेडकर,योगेश शिंदे,हसन पाटील ,उच्याप्पा वरचाली ,वडील सतिष पवार,आई वैशाली पवार,पती-दीनेश जाधव,सासरे-सुरेश जाधव,सासू-विद्या जाधव, संतोषी म्हात्रे व परिसरातील सर्व कुटुंबातील सदस्यांनी  सारिकाने पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले.

              शिक्षणाचा गंध नसलेल्या सतिष(नाना) पवार यांनी आपली मुले चांगली शिकली पाहिजेत असाच जणूकाही निच्छय केल्याचे दिसून आले.आपल्या मुलांनी उच्च दर्जाचे शिक्षण घ्यावे हा त्यांचा अट्टाहास होता.तो मात्र आज सारिकाच्या प्रयत्नाने पूर्ण होतांना पाहून वडील संतोष (नाना) पवार व आई वैशाली पवार यांच्या डोळ्यातील अश्रू तून दिसून येत होते.या कुटूंबातील सारिकाने तर कमालच केली.लग्न झाल्यानंतर संसाराचा गाडा आनंदाने हाकण्यासाठी तत्पर झालेल्या सारिकाने आपले शिक्षण पूर्ण केले सोबत नोकरी मिळविण्यासाठी १० वर्ष सुरू ठेवलेले प्रयत्न महत्वाचे असल्याचे तिने मिळविलेल्या यशातून दिसून येते.
              अनंत अडचणींचा सामना करतांना तिला मिळालेली आपल्या कुटूंबाची साथ सर्वात महत्वाची असल्याचे ती मोठ्या अभिमानाने सांगते.आपणास मिळालेले सासू सासरे हे माझे दुसरे आई वडीलच आहेत आणि हा जो आजचा दिवस गोड करण्यासाठी त्यांचेच योगदान मोठे आहे.पतीदेवांचा तर विषयच वेगळा आहे,त्यांनी मला प्रत्येक गोष्टीत दिलेली साथ आणि माझ्या प्रयत्नाला उंच उडण्यासाठी दिलेले बल या गोष्टींमुळे मी हे यश संपादन करू शकले आहे.माझ्या यशात मोठा वाटा उचलणारे माझे आई-वडील,सासू-सासरे,पती व सर्व कुटुंबातील सदस्यांचे आभार व्यक्त करीत असल्याचे सारिका हिने सांगितले.


              यावेळी बोलतांना सारिकाने पती दीनेश जाधव यांनी मोजक्याच शब्दात मात्र सारिकाच्या मेहनतीचे व आपल्या आई- वडीलांनी सारिकाच्या यशासाठी दिलेली मोकळीक याचेच फळ सारिकाने यशाच्या माध्यमातून मिळविले असल्याचे सांगून सारिकाचे खास अभिनंदन केले.आज सारिकाने मिळविलेल्या यशाचे कौतुक करणारा कौटुंबिक सोहळा असल्या तरी या सोहळ्यातून खूप मोठा बोध घेण्यासारखा आहे.अशिक्षित पालकांची इच्छा पूर्ण करून त्यांच्या जीवनाचे सार्थक करण्यासाठी मुलांनी कशी मेहनत घ्यावी हेच यातून दिसून आले.कार्यक्रमाचा शेवट आभार व्यक्त करून करण्यात आला.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर