कोमसाप खोपोली शाखे तर्फे मराठी भाषा गौरव दिन आयोजन

 कोमसाप खोपोली शाखे तर्फे मराठी भाषा गौरव दिन आयोजन



पाताळगंगा न्यूज : जयवंत माडपे 
खोपोली : २४ फेब्रुवारी,


       कोकण मराठी साहित्य परिषद शाखा खोपोली, आयोजित मराठी भाषा गौरव दिन व पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन २७  फेब्रुवारी २०२४  रोजी करण्यात येणार आहे अशी माहिती शाखेच्या अध्यक्ष उज्वलाताई दिघे यांनी खोपोली येथे दिली.
                 याच कार्यक्रमात पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य मित्र व माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर,असणार आहेत या संपूर्ण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ कवी अशोक गुप्ते, अल्ता लॅबोत्रीच्या संचालिका गीता धोटे, कोमसाप केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, कोमसाप जिल्हा अध्यक्ष सुधीर शेठ, कोमसाप केंद्रीय जनसंपर्क प्रमुख प्रा. एल बी पाटील, व्ही डी एम स्कूल संस्थापक विलासराव देशमुख, कोमसाप जिल्हा समन्वयक अ. वि. जंगम, कोमसाप जिल्हा प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी इत्यादी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. 
           ब्राह्मण सभा खोपोली सभागृहात २७  फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता सदरचा कार्यक्रम होणार असल्याची कोमसाप खोपोली शाखा अध्यक्ष व जेष्ठ कवियत्री उज्वलाताई दिघे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली. खोपोलीतील साहित्य प्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असेही आवाहन त्यांनी केले.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण