घोडीवली गावात एकाच रात्री पाच घर फोडली - नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण सुदैवाने काहीही ऐवज गेले नाही चोरीला
पाताळगंगा न्यूज : नवज्योत पिंगळे
खालापूर : २८ फेब्रुवारी
घोडीवली गावात चोरट्यांनी धुमाकूळ घालत बुधवार दि.२८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान पाच घरांचे कडीकोयंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.दोन घरांमध्ये कोणीही राहत नसून तीन घरातील लोक गाढ झोपत होते. कपाट आणि इतर सामान अस्ताव्यस्त केलं, मात्र काही ऐवज चोरीला गेलं नसल्याचे घरातील लोकांचे म्हणणे असून सदर चोर फेरीवाले असू शकतात असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. चोरीचे प्रमाण वाढल्याने गावात भितीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील घोडीवली बुधवार दि.२८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान संदीप गंगाराम पिंगळे, ज्ञानेश्वर हळुराम पिंगळे, सुनील महादू पिंगळे, सुरेश वामन भोसले, सुशांत अंनत पालांडे यांच्या घराच्या दरवाज्याचे कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. यादरम्यान घरातील कपाट इतर सामान अस्तव्यस्त केले असता काहीही सापडले नाही. घरातील माणसं जागी झाल्याची चोरट्यांची कुणकुण लागताच तेथून पळ काढला आहे. दरम्यान दोन घरं कायम बंद असल्यामुळे काही सापडले नाही. तीन घरांमधील सामान अस्तव्यस्त केलं होते.
सदर घटनेची खालापूर पोलिस ठाण्यात माहिती कळविताच पोलिस घटनास्थळी पोहचून पंचनामे केले आहे.तर घोडीवली - नावंढे गावात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असता घोडीवली व नावंढे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, काही महिन्या पूर्वी चोरट्यांनी चोरी करित हजारो रुपयांची रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले होते. त्यामुळे या चोरट्याला पकडणे खालापूर पोलीसांपुढे मोठे आव्हान होते,
खालापूर पोलीस दिवस रात्र या चोरट्याच्या मागावर असताना खालापूर पोलिसांना मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिकांनी सहकार्य करित रात्रभर जागता पहारा देत होते, परंतु चोर हा शातिर बुध्दी असल्याने तो सर्वाना चकवा देत वेगवेगळ्या पध्दतीने चोरी करतच राहिला. मात्र चोर नावंढे येथील चोरी करताना सीसीटीव्ही कँमेरामध्ये कैद झाला असता या कँमेरेच्या फुटेजवरून पोलिसांनी चोरट्यांचे स्केज बनवून आपली तपास यंत्रणा जलद गतीने सुरू ठेवली असताना खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरट्याला जेरबंद करण्यात खालापूर पोलिसांना यश आले होते. याच घटनेला काही महिने उलटून गेल्यावर घोडीवली पुन्हा घरफोडी झाल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चौकट -
गावामध्ये मंदिराच्या ठिकाणी सीसीटिव्ही आहेत, परंतु चोरी ही जास्त वस्ती असलेल्या ठिकाणी झाली असल्यामुळे त्याठिकाणी कोणतीही व्यक्ती निदर्शनास आढळून आली नसल्यामुळे पुढील तपास खालापूर पोलीस करत आहेत.
वैशाली महेश पिंगळे - पोलीस पाटील
0 Comments