अंकित साखरे यांच्या वाढदिवसानिमित्त खरिवली येथे आरोग्य शिबीर

 राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकित साखरे यांच्या वाढदिवसानिमित्त खरिवली येथे आरोग्य शिबीर संपन्न) ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याची तपासणी




पाताळगंगा न्यूज : हनुमंत मोरे 
वावोशी / खोपोली : २४ फेब्रुवारी

                   खालापूर तालुक्यातील खरीवली ग्रामपंचायत हद्दीमधील स्थानिक लोकांच्या आरोग्य तपासणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने छत्तीशी विभागातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उभारते नेतृत्व मनीष चंद्रकांत विचारे यांच्या नेतृत्वाखाली आज आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी हजेरी लावून आरोग्य तपासणी करून घेतली.या तपासणीत ज्यांना खरोखरच अधिक उपचाराची गरज आहे,त्यांच्यावर पुढील उपचार मोफत करण्याचाही संकल्प अंकित साखरे यांनी केला असून या आरोग्य सेवेसाठी छत्तीशी विभागातील युवा नेतृत्व मनीष चंद्रकांत विचारे हे अधिक परिश्रम घेतांना दिसत आहेत.

                    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष अंकित साखरे यांचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला असून त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम देवन्हावे या त्यांच्या गावी आयोजित करण्यात आले होते.मात्र यातील आरोग्य तपासणीचा कार्यक्रम आपल्या गावी किंवा खेडोपाड्यातील गरजू असलेल्या गरीब लोकांसाठी करण्यात यावा.या उद्देशाने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व तसेच छत्तीशी विभागातील उभरते नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते मनीष चंद्रकांत विचारे यांनी अंकित साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या परिसरातील खरीवली येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.
                या शिबिराला परिसरातील लोकांनी उदंड प्रतिसाद दिल्यामुळे शिबिराचे आयोजन यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले.शिबिराला परिसरातील विविध राजकीय पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भेट देऊन शिबिराच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले आहे.या शिबिराला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे व त्यांच्या सहकारी मित्रांनी भेट दिली.आपल्या वाढदिवसानिमित्त खरोखरच गरीब लोकांना गरज असलेले आरोग्य शिबिर उत्तमरीत्या राबविल्याचे पाहून अंकित साखरे यांना आनंद झाला.
                 आरोग्य शिबिराचा फायदा सर्वसामान्य लोकांना करून दिल्याबद्दल अंकित साखरे यांनी मनीष विचारे व आयोजकांचे आभार व्यक्त केले. यावेळी बोलताना त्यांनी असेही सांगितले की आपला वाढदिवस हे निमित्त जरी असले तरी यापुढे कोणत्याही गोरगरीब व्यक्तीला त्याच्यावर उपचार करण्यासाठी कोणत्याही प्रकारची गरज लागली तर ती मदत करण्यासाठी मी सदैव तत्पर राहणार आहे.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण