सकल मराठा समाजाकडून खालापूरात रास्ता रोको आंदोलन करत खालापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खालापूर : २४ फेब्रुवारी,
मराठा समाजाला आरक्षण देताना शासनाने सगे सोयरे मुद्दयाला दिलेली बगल विरोधात मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे.शनिवारी मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार खालापूरात रास्ता रोको आंदोलन करून आरक्षणाच्या भूमिकेबाबत जरांगे पाटील यांच्या भूमिकेचे निवेदन शासनाचे प्रतिनिधी तहसीलदार आयुब तांबोळी यांना देण्यात आले.
मराठा समाजासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी शासनाने आरक्षण देताना मराठा समाजाची झालेली फसवणुकी विरोधात पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे.नागरिकांचा मागास प्रवर्गातून आरक्षण मिळावे तसेच सगे सोयरे मुद्द्याचा आधार घेत आरक्षण देण्यात यावे या मागणीला राज्य शासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्याची भावना सकल मराठा समाजाची आहे.
खालापूर तालुक्यातील प्रत्येक गावातून निवेदन तयार करण्यात आले असून आरक्षणाबाबतची जरांगे पाटील यांच्या भूमिकेचे समर्थन करणारे पत्र तयार करण्यात आले आहे. शनिवारी तालुक्यातील मराठा समाजाचे सुनील पाटील एकनाथ पिंगळे ,उत्तम भोईर, किरण हडप ,भाऊ सणस, जे पी पाटील ,राजेश पारठे,भरत पाटील, काशिनाथ पाटील, अमोल बांदल पाटील,राजेश पाटील,संकेत हाडप,उमेश पडवकर,संभाजी पाटील, नितीन पाटील, दीपक जगताप, दिपक हडप, मंदा भोसले अनिता पाटील, धनश्री दिवाण, कविता पाटील
यांच्या सह मोठ्या संख्येने मराठा समाज एकवटला होता. जुन्या मुंबई महामार्गावर खालापूर फाटा येथे काही मिनिटांचा रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर तहसीलदार आयुब तांबोळी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आंदोलनादरम्यान कुठे अनुचित प्रकार घडला नाही.
0 Comments