रोजगारासाठी खानाव येथिल ग्रामस्थांचा अमरण उपोषण,गोदरेज इमॅजिका प्रकल्प यांचा मनमानी कारभार,लोकप्रतिनिधी दुर्लक्ष्य
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खानाव : २३ फेब्रुवारी,
खालापूर तालुक्यातील असलेल्या खानाव या गावाच्या हद्दीत गोदरेज इमॅजिका हा प्रकल्प सहा महिन्यापासून सुरु आहे.यामुळे आपणांस रोजगार मिळेल,मात्र ती आशा फोल ठरली.यासाठी अनेक ठिकाणी पत्रव्यवहार करण्यात आला.मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले.जवळ १२० एकर ह्या जागेमध्ये हा प्रकल्प उभा राहत असल्यामुळे मात्र स्थानिकांना या मालकांनी गाजर दाखविल्यामुळे येथील ग्रामस्थांनी आमरण उपोषांचे हत्यार उपसले असून जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत हे आंदोलन असेच सुरूच राहणार असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.
पूर्वी या ठिकाणी या गावातील ग्रामस्थ भात शेती समवेत कडधान्ये चे उत्पादन घेत होते.मात्र आता या ठिकाणी गोदरेज चा प्रकल्प आल्यामुळे त्यांचा रोजगार हिरावला गेला आहे.ही जागा १५ ते २० वर्षा पूर्वी विकण्यात आली होती.मात्र त्या जागेवर होत असालेल्या प्रकल्पाला आमचा विरोध नाही.मात्र आम्हा ग्रामस्थांना रोजगार मिळावे यासाठी हे आमरण उपोषण सुरु असून आम्हाला रोजगार मिळावा.
सदर हा प्रकल्प ज्या ठिकाणी सुरु आहे.त्याच रस्त्यालगत आंदोलनाचा तंबू या ठिकाणी बांधण्यात आला आहे.यामुळे या ठिकाणी धुळीचा सामना कारवाया लागत असल्यामुळे अनेकांना श्वसनाचे आजार निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.तसेच या ठिकाणी आरोग्य खात्यांची कोणतेही अधिकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी या ठिकाणी पाठ फिरविल्यामुळे स्थानिकांच्या मधून नाराजीचा सूर उमठत आहे.मात्र राजकिय लोक या प्रकल्पामुळे आपली पोळी भाजून घेऊन ते खातात तुपाशी आणि स्थानिक मात्र उपाशी अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झाल्याचे तानाजी मोगरे,आर.पी.आय.युवक अध्यक्ष ( आठवले गट ) सुनिल सोनावणे,जितेंद्र धामणसे,सुनील पाटील तसेच ग्रामस्थ यांनी प्रतिनिधी बोलतांना सांगितले
0 Comments