राज्य कार्यकारिणी प्रदेश युवक आघाडी संघटक पदी ॲड.उत्तम गायकवाड यांची नियुक्ती

 राज्य कार्यकारिणी प्रदेश युवक आघाडी संघटक पदी ॲड.उत्तम गायकवाड यांची नियुक्ती 



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
कर्जत : १२ फेब्रुवारी,

            रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.रामदासजी आठवले यांच्या आदेशा नुसार महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडी संघटक पदी ॲड.उत्तम गायकवाड यांची नवी मुंबई येथे ना.सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी,ही निवड करण्याचे सुचविले,यामुळे  सर्वत्र ठिकाणी त्याच्यावरती शुभेच्छेचा वर्षाव होत आहे.गायकवाड हे पेशाने वकील असल्यामुळे, त्याच बरोबर राजकीय अनुभव दांडगा असल्यामुळे साहजिकच त्यांचा या पदाचा उपयॊग पक्ष उभारणीसाठी होण्यांस मदत होईल.
                 डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून व्यापक रिपब्लिकन पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न करावेत,असे सूचित करण्यात आले.त्याच बरोबर ही नियुक्ती तीन वर्षे असल्यामुळे या कालखंडात आपल्याकडून जेवढे समाजकार्य करता येईल यासाठी आपण भर द्यावे,गायकवाड हे वकिल आल्यामुळे साहजिकच त्यांच्याकडे कायद्याचे ज्ञान असल्यामुळे एखाद्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांचा उपयोग होणार असल्याचे बोलले जात होते.
               ॲड.उत्तम गायकवाड हे तरुणवर्गांचे गळयातील ताईत असून,प्रत्येकांच्या सुख ,दुःखात सातत्याने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असल्यामुळे त्यांच्यावर टाकण्यात आलेली जबाबदारी निश्चितच ते सामाज्यासाठी यांचा उपयोग करणार,यामुळे त्यांच्या चाहत्याने त्यांस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी,महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष -पप्पू कागदे,राज्य सरचिटणीस डॉ.विजय मोरे,यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी या कार्यक्रमास महाराष्ट्रातील सर्व युवक अध्यक्ष,राज्य कार्यकरणी सदस्य उपस्थित होते.       
          

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन