व्यवस्थापक यांनी कामगारांना दाखविला घरचा रस्ता,कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड कामगारांचे साखळी उपोषण,

 व्यवस्थापक यांनी कामगारांना दाखविला घरचा रस्ता,कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड कामगारांचे साखळी उपोषण,




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
पौद  : १६ फेब्रुवारी,

                   पौद गावजवळ घरघुती सिलेंडर बनविण्यांचा कारखाना असून या ठिकाणी येथिल स्थानिक कामगार काम करीत आहे.मात्र गेले दोन महिन्यापासून त्यांना पगारापासून वंचित ठेवून त्यांस कामावरुन काढून टाकण्यांची धमकी,दिल्यामुळे येथिल कामगारांनी साखळी उपोषणांचे हत्यार उपसले आहे.जो पर्यंत आमच्या मागण्या पुर्ण होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्यांचे कामगारांनी सांगितले.तसेच येथिल एक महिला कामगार यांस आरेरवाची भाषा वापरत असल्यांमुळे येथिल कामगार संतप्त झाले आहे.

           या कारखान्यांचे पुर्वीचे नाव सनुज स्टील, आता कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड,या नावांने संबोधले जात होते. या कारखान्यात कोकण श्रमिक संघ,संलग्र हिंद मजदूर सभा महाराष्ट्र कौन्सिल श्रुतीताई श्याम म्हात्रे यांची युनियन असून त्यांच्या नेतृत्वाखाली,या कामगारांनी आंदोलनांचे हत्यार उपसले असून,आज यांचा दुसरा दिवस असून जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत हे उपोषण सुरुच राहणार असल्यांचे येथिल कामगारांनी सांगितले.यावेळी या परिसरातील स्थानिक कार्यकर्ते यांनी कामगारांची भेट घेवून त्यांचा मनोबल वाढण्यासाठी सहकार्य केले.

                गेले दोन महिने पगार मिळत नसल्यामुळे घरचे भागविणे मोठ्या कष्टाचे जात आहे.त्यातच व्यवस्थापक अडमुठे धोरण स्विकारत असल्यामुळे,आम्ही जगायचे कसे,या कारखान्यात काही महिन्यात दिड लाखापेक्षा जास्त घरघुती सिलेंडर तयार केले जात आहे.मात्र दोन महिने मागणी कमी झाल्यामुळे कामगार कमी करण्यांचा निर्णय घेतल्यामुळे कामगारांच्या पायाखालची वाळू सरकली असून पर्याय मार्ग म्हणून साखळी उपोषणांचे हत्यार काढले असल्यांचे युनियन कामगार  प्रमोद काठावले, रणधीर पाटील,संतोष भोईर,संदीप काठवले,दत्तात्रेय गारुडे,अरुण भोईर,रोहिणी टेंबे,दिपक जाधव यांनी सांगितले.
             

Post a Comment

0 Comments

एक्झॉनमोबिल कंपनी कडून विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्य वाटप