भारतीय जनता पार्टी कर्जत खालापूर विधानसभा आयोजित नमो चषक बैलगाडा स्पर्धेमध्ये शर्यतीचा धुरळा...
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खालापूर : १७ फेब्रुवारी,
कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघामध्ये भारतीय जनता पक्ष व कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्या माध्यमातून नमो बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.ठाणे रायगड जिल्ह्यातील हजारो बैलगाडा स्पर्धेकांनी ह्यामध्ये सहभाग घेतला होता. या वेळी तब्बल १७० शर्यती पार पाडल्या.
कर्जत खालापूर विधानसभा भाजपचे निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्या माध्यमातून नमो चषक बैलगाडा स्पर्धेचे आयोजन शेलू ढोणे येथे चेडोबा मैदानावर करण्यात आले होते. या शर्यतीच्या उदघाटन सोहळ्याला कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर, तालुका उपाध्यक्ष नरेश म्हसणे, यांच्या सोबत कर्जत तालुका बैलगाडा संघटना अध्यक्ष नारायण डामसे, भगवान चंचे, विजय म्हसकर, सरपंच शिवाजी खारीक आदी उपस्थित होते.
जय चेडोबा मंडळाच्या वतीने बैलगाडा शर्यतीचे संयोजन करण्यात आले होते. या शर्यतीसाठी बैलगाडा शर्यतीचे मुंबई अध्यक्ष भोपर येथील संदीप माळी, उपाध्यक्ष चिखलोली येथील अविनाश पवार, मंगरूळ येथील पप्पू पाटील, भगवान पाटील सोन्या बैलाचे मालक जयेश पाटील आवर्जून उपस्थित होते.
राणा या बैलाचे मालक भोपर येथील संदीप माळी आणि शेलू येथील सदानंद मसने यांच्याबैलजोडीमधील बैलांची शर्यत रंगतदार झाली.५ हजारा पासून ते २५ हजारापर्यतच्या शर्यती मैदानावर रंगल्या.या शर्यतिचे मैदानात सकाळी १० वाजता सुरु झालेल्या शर्यतिमध्ये रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यतप्रेमी यांनी सहभाग घेतला.दरम्यान बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघात शेलू येघे धुरळा उडाल्याचे दिसून आले.
ह्या सोहळ्याला मा.आमदार सुरेश लाड, जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, सुनील गोगटे, जिल्हा सरचिटणीस दिपक बेहरे, मंदार मेहंदले, रमेश मुंढे, शरद लाड, राजेश लाड, अनिल जैन, कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघातील भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी आणि बैलगाडा शर्यत प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर नमो चषक बैलगाडा पार पाडण्यासाठी संजय कराले, ऋषिकेश जोशी, प्रज्ञेश खेडकर, किशोर ठाकरे, सागर ठाकरे,राजेश ठाणगे, विशाल कोकरे, अभिजित पटेल, अभिषेक तिवारी, दिपक शेकटे ग्रामपंचायत सदस्य, समीर बोराडे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली
0 Comments