माजी नगराध्यक्ष स्वर्गीय एल.एम.साबळे यांच्या पुण्यस्मरण दिना निमित्ताने रक्तदान आणि आरोग्य शिबीर खोपोलीत संपन्न
पाताळगंगा न्यूज : समाधान दिसले
खालापूर : २७ फेब्रुवारी,
खोपोलीच्या राजकारणात ज्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते, असे लक्ष्मणशेठ साबळे यांचे नगरपालिका प्रशासनावर मोठा दबदबा होता. नगरपालिकेचा कारभार पारदर्शक असावा यासाठी पालिकेची सभेचे थेट प्रक्षेपण घरोघरी दाखविण्याची व्यवस्था साबळे यांनी केली होती. एल.एम.साबळे यांच्या पुण्यस्मरण दिना निमित्ताने यशवंत साबळे मित्र परिवाराने महाराजा मंगल कार्यालयात रक्तदान आणि आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते.तर खोपोलीतील विविध भागातील नागरिक,अबालवृध्दांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.
खोपोलीतील महाराजा मंगल कार्यालयात
आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल-नवीन पनवेल, सर्वोदय हॉस्पिटल समर्पण ब्लड बँक, टाटा मेमोरियल सेंटर - मुंबई आणि प्रिवेंटिव्ह ओनकॉलॉजी सर्व्हिसेस, खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया कर्करोग पूर्व तपासणी आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी एल.एम.साबळे यांच्या पत्नी काशिबाई साबळे, मुलगा यशवंत साबळे, स्नुषा रेणूका साबळे, नातू विक्रांत साबळे यांनी अभिवादन केल्यानंतर शिबीराला प्रारंभ करण्यात आले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, शेकापक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील, खालापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष संतोष जंगम, माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, शेकाप शहर चिटणीस अविनाश तावडे, माजी नगरसेवक मंगेश दळवी, मनेष यादव, केटीएस मंडळाचे उपाध्यक्ष अबू जळगावकर, चंद्राप्पा अनिवार, शिवसेनेचे शहर प्रमुख संदीप पाटील, चंद्रकांत केदारी, विनायक तेलवणे यांच्या सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
तर यावेळी ५८ जणांनी रक्तदान केले या सर्वांना टिशर्टचे वाटप करण्यात आले असून ४७ कँन्सर तपासणी, १५१ जणांची नेत्र तपासणी त्यामधील १४ रूग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले आहे. ३५ रूग्णांनी दंत तपासणी केली आहे. एम.साबळे यांच्या स्नुषा रेणूका साबळे, नातू विक्रांत साबळे यांनीही रक्तदान करून श्रद्धाजली अर्पण केली आहे. तसेच रक्तदान आणि आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी शैलेशभाई विठलाणी, सुहास बझरकर, लक्ष्मण कुलकर्णी, विक्रम साबळे मित्र परिवाराने मेहनत घेतली होती.
चौकट -
एल.एम.साबळे दादा स्वभावाने कडक पण प्रेमळ होते, गोरगरिबांना मदतकार्य त्याकाळात भरपूर केले आहे, त्याचा मी साक्षिदार आहे. परंतु त्याकाळात मिडीया नव्हता त्यामुळे त्याच्या कार्याचा गौवगवा झाला नसला तरी त्यांच्या सामाजिक कार्याचा मी साक्षिदार आहे
आझमभाईं
चौकट -
माझे आजोबा एल.एम.साबळे यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने रक्तदान आणि आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. खोपोलीकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देवून तपासणी केल्याबद्दल धन्यवाद तसेच आजोबांनी केले सामाजिक यापुढेही अविरत चालू ठेवणार.
विक्रांत साबळे - उद्योजक
0 Comments