प्राथमिक शिक्षक संघाच्या खालापूर तालुकाध्यक्ष पदी मुख्याध्यापक संदीप रत्नाकर जाधव

 प्राथमिक शिक्षक संघाच्या  खालापूर तालुकाध्यक्ष पदी  मुख्याध्यापक संदीप रत्नाकर जाधव   




पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे 
खालापूर : २३,फेब्रुवारी,


 खालापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या  खालापूर तालुकाध्यक्ष पदी  मुख्याध्यापक संदीप रत्नाकर  जाधव यांची नुकतीच निवड करण्यात आली, 
               खालापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाची  सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली ,असून यावेळी नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली, यावेळी  जेष्ठ सल्लागार दिलीप देशमुख यांनी मावळते अध्यक्ष संतोष पाटील यांनी वर्षभरामध्ये  राबविलेल्या  उपक्रमाचे कौतुक करून चांगले काम केल्याबद्दल आभार मानले,  तर तरुण आणि हुशार ,शांत आणि संयमी  सर्वगुण संपन्न असलेले मुख्याध्यापक  संदीप  रत्नाकर जाधव  यांची सर्वानुमते एकमताने तालुका अध्यक्ष पदी  निवड करण्यात  आली, तर कार्याध्यक्षपदी मारुती दासरे, खजिनदार पदी विठ्ठल देशमुख, यांची निवड करण्यात आली , यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या घोषित करून त्यांचे सर्वांच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
                  यावेळी जेष्ठ सल्लागार दिलीप दत्तात्रय देशमुख, माजी अध्यक्ष उमेश विचारे, संतोष पाटील, सरचिटणीस दीपक पालकर, जिल्हा उपाध्यक्ष सचिन कडू ,शिक्षक राजेश बाविस्कर, हनुमंत गाडे, शशिकांत फणसे, जगदीश मोहने, धनाजी थिटे, पांडुरंग काळे, नारायण गाडे, बळीराम चव्हाण, आबा कदम, रविंद्र भोईर, संजय चव्हाण, संजय पाटील, राजकुमार केंद्रे सर, राम बिरादार, प्रदीप बडे सर, विशाल गावडे सर, आदींसह अनेक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण