कर्जत मध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
पाताळगंगा न्युज : नवज्योत पिंगळे
खालापूर : ३ मार्च,
सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपेने संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशन झोन खरसई रायगड ४०अ अंतर्गत शाखा-मार्केवाडी, यांच्या वतीने रविवारी ३ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी २ दरम्यान कर्जत येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिरामध्ये रक्तसंकलन शासकीय रक्तपेढी आलिबाग-रायगड डॉ.गोसावी यांच्या मार्फत सहभाग दर्शविण्यात आला. शंबर च्या आसपास रक्त दात्यानी रक्त दान केले संत निरंकारी मंडळामध्ये रक्तदान शिबिराची ही शृंखला २३ ऑक्टोबर १९८६ पासून सुरू झाली असून दरवर्षी २४ एप्रिल मानव एकता दिवस या दिवसापासून संपूर्ण विश्वात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते, याच अनुषंगाने कर्जत येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नगरसेवक संकेत भासे, मार्केवाडी मुखी शांताराम लदगे, सेवादल अधिकारी प्रकाश मार्के, महिला अधिकारी करुणा धारणे, शिक्षक, शिक्षिका मार्केवाडी युनिट सेवादल आदी संत निरंकारी मिशनचे अनुयायी उपस्थित होते
चौकट
संत निरंकारी मंडळाचा रक्तदानाचा हा सामाजिक पैलू मनुष्यमात्राच्या मनामध्ये मानवतावादी भावनांना उद्योन्मुख करत आहे. तरी रक्तदान शिबिरासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उपस्थित राहण्या करता रक्तदान या महान मानवी कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी गावा गावात प्रचार करण्यात आला
शांताराम लदगे - मुखी मार्केवाडी ब्रांच
चौकट
संत निरंकारी मिशनची सामाजिक उपक्रमामध्ये कौतुकास्पद कामगिरी आहे. मिशनच्या माध्यमातून वर्षभर जिल्ह्यात शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित केले जातात. त्याचबरोबर आपत्कालीन मदतकार्य, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व अन्य सामाजिक उपक्रमांमध्ये संत निरंकारी मिशन सहभाग घेत असते. तसेच संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून सेवाकार्य करत आहे,
ऍड. संकेत भासे -नगरसेवक कर्जत नगरपरिषद
0 Comments