कल्याणकारी धनगर समाज संस्थेच्या वतीने हळदी कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

 कल्याणकारी धनगर समाज संस्थेच्या वतीने  हळदी कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न




पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे 
खालापूर : ७ मार्च,


               रायगड धनगर समाज कल्याणकारी संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यामानाने मुंबईमध्ये वास्तव्यास असणाऱ्या धनगर समाजातील महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम तसेच मुंबईत शिक्षण घेणाऱ्या समाजातील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम ३ मार्च रोजी मुंबई येथील साहित्य संघ मंदिर नाट्यप्रभा गिरगाव येथे संपन्न झाला.सदरील कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
              त्यानंतर रायगड जिल्हा कल्याणकारी संस्था मुंबईचे अध्यक्ष जनार्धन ढेबे यांनी सांगितले की, रोहा,मुरुड,तळा,अलिबाग या तालुक्यांमधील मुंबईमध्ये राहात असणाऱ्या आपल्या समाजातील कष्टकरी महिलांना एक दिवस एकत्रित आणून त्यांचा आनंद द्विगुणीत करावा या उद्देशाने हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील करण्यात आला आहे. त्याचबरोबर माता भगिनींना भेडसवणारे प्रश्न व अडचणी याविषयी त्यांना मार्गदर्शन केले जाते.तसेच मुंबईतील विद्यार्थ्यांना आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यातून आपली धनगरी परंपरा,धनगरी नृत्ये,बोलीभाषा गीते सादर करत संस्कृतीचे जतन केले जाते.
          या कार्यक्रमासाठी  रायगड कल्याणकारी धनगर समाज तळा,मुरुड,रोहाचे अध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे,सचिव भालचंद्र कोकळे, तसेच मुंबईतील उपाध्यक्ष महेश लांबोरे, व्हीपी रोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक खांडेकर, गिरगाव विभाग प्रमुख  दिलीप नाईक,टिटवी शिवसेना शाखाप्रमुख हरिश्चंद्र अवकिरकर,सचिव प्रकाश वरक,कार्याध्यक्ष वसंत शिंगाडे,गणेश गोरे,नामदेव झोरे,हरिश्चंद्र लांबोरे तसेच महिलावर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले व शेवटी सचिव प्रकाश वरक यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण