राज्यात कंपन्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर,युनियन आणि कामगारांनी पुढाकार घेऊन कंपन्याना सहकार्य करावे - कामगार नेते दिलीप जगताप

 राज्यात कंपन्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर,युनियन आणि कामगारांनी पुढाकार घेऊन  कंपन्याना सहकार्य करावे - कामगार नेते दिलीप जगताप 



पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे 
खालापूर : ६ मार्च,

                 महाराष्ट्रात कंपन्याची परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली असून कंपन्या टिकवायच्या असतील तर युनियन आणि कामगारांनी पुढे येऊन कंपन्यांना सहकार्य करावे,जेणेकरून कंपन्या दुसऱ्या राज्यात जाणार नाहीत असे आवाहन भारतीय कर्मचारी महासंघ कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा कामगार नेते दिलीप दादा जगताप यांनी खोपोली येथिल रिषीवन येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलतांना म्हणाले.
       ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग  बाहेर राज्यात चालले असल्याने येणाऱ्या काळात महाराष्ट्रात तरुण बेरोजगारांची संख्या वाढणार आहेत, तर आता सद्य स्थितीत असलेल्या कंपन्या  टिकवायच्या असतील तर कामगार आणि युनियन यांनी एक पाऊल पुढे येत कंपनीला सहकार्य करावे, 
             तर अनेक कंपन्यात स्थानिक राजकारणी, राजकीय पक्षाचे पुढारी  स्थानिक कामगार, यांची दादागिरी वाढत असल्याने चालू असलेल्या अनेक कंपन्या बंद पडल्याचे पाहायला मिळत आहे, त्या जर टीकवयाच्या असतील तर  युनियन आणि कामगारांनी एकत्र येऊन कंपनी व्यवस्थापनाला मदत करून कंपनी टिकवण्यासाठी मदत केली  पाहिजे, जेणेकरुन येथील कामगार जगला पाहिजे  असे आवाहन भारतीय कर्मचारी महासंघ कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा कामगार नेते दिलीप दादा जगताप यांनी केले आहे,





Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर