अखेर साजगाव ताकई प्रलंबित रोड साठी वनखात्याने दिली परवानगी,

 अखेर साजगाव ताकई प्रलंबित रोड साठी वनखात्याने दिली परवानगी,ग्रामस्थांसह सर्वांनी मानले आम आदमी पार्टीचे आभार, 

 आपचे जिल्हाध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांच्या अकरा दिवसीय बेमुदत साखळी उपोषणास यश..


पाताळगंगा न्युज : दत्तात्रेय शेडगे 
खालापूर : ७ मार्च,

                  प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या साजगाव परिसरातील साजगाव ताकई रोडचे काम बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होते.ग्रामस्थांनी या संदर्भात कित्येक वेळा निदर्शने करून या रोडच्या प्रयत्नांसाठी आंदोलनही केले होते. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबतीत आम आदमी पाठीशी संपर्क साधला असता आपचे जिल्हाध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांनी यावर सातत्यपूर्ण आवाज उठविला आहे.ऐन दिवाळीत व पावसात १३ दिवसीय साखळी उपोषण करून  रोडसाठी प्रयत्न केलेले आहेत.प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित केलेले उपोषण काम सुरू होत नाही हे लक्षात आल्यावर दिनांक २६  फेब्रुवारी २०१४ पासून खोपोली नगरपरिषदेसमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करून जोपर्यत वनखात्याची परवानगी येत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवणार या त्यांच्या वज्रनिर्धाराने प्रशासनाने अखेर तांत्रिक बाबी पूर्ण करून दिनांक ०७  मार्च २०२४  रोजी परवानगी आणण्यात यश मिळवले आहे.
             या उपोषणात आपचे सहकारी दिपक कांबळे,शिवा शिवचरण,राहुल ओव्हाळ,विवेक वाघमारे,चंद्रप्रकाश उपाध्याय,दमण सिंघ, भगवान पवार,कार्तिक ईटी, कमल चौधरी,धनवंती नागर, गौरी येरूनकर,धर्मेंद्र चव्हाण सैफ पठाण,सुमन शर्मा,निवृत्ती मोरे,विजय म्हेत्रे,प्रसन्न त्रिभुवन
यांनी मोलाची साथ देताना पंचक्रोशीतील नागरिकांनी सक्रिय सहभाग दिलेला आहे.विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामजिक संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार,नागरीक,प्रशासन  यांनी मोलाची साथ दिलेली आहे.
              वनखात्याची परवानगी आणताना झालेल्या संघर्षमय लढ्यात या रोडसाठी निधी उपलब्ध करून देणारे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे,सातत्यपूर्ण साथ देणारे पंचक्रोशी ग्रामस्थ,पत्रकार तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी,सामाजिक संस्थांचे पदाधिकारी,प्रशासकीय अधिकारी,पोलीस दल,नागरीक यांचे मनपूर्वक आभार मानताना भविष्यातही नागरी प्रश्नांसाठी लढा सुरूच ठेवताना हे सर्व श्रेय कळत नकळत साथ देणाऱ्या हातांना आहे असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर