खालापूर तालुक्यातील चावणी आदिवासी पाड्यावर लैंगिक शिक्षण व विवाह समुपदेशन संपन्न....

 खालापूर तालुक्यातील चावणी आदिवासी पाड्यावर लैंगिक शिक्षण व विवाह समुपदेशन संपन्न....


सहज सेवा फाऊंडेशनचा तालुक्यात आदिवासी पाड्यावर समुपदेशनाचा प्रारंभ 



पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे  
खालापूर  : १३ मार्च,

              सहजसेवा फाऊंडेशन ७ वर्षाहून अधिक काळ सातत्यपूर्ण सामाजिक कार्य करीत आहे.समाजातील विविध घटकांसाठी कार्यरत राहणे हे व्रत घेवून कार्य करणाऱ्या सहज सेवा फाऊंडेशनमुळे विविध घटकांना सेवा मिळत आहे.सामुदायिक विवाह सोहळ्याच आयोजन करताना अनेक वेळा कमी वयात लग्न करणारे जोडपे व त्यांना येणाऱ्या समस्या लक्षात घेताना आदिवासी समाजात मार्गदर्शन करणे गरजेचे आहे हे लक्षात घेवून आदिवासी समाजातील घटकांमध्ये लैंगिक शिक्षण महत्त्वाची बाब आहे .तसेच बालवयात लग्न झाल्याने पुढील आयुष्यात होणारे नुकसान,सामुदायिक विवाह सोहळ्याचे महत्त्व व गुन्हेगारीला आळा घालणे यासाठी खालापूर तालुक्यातील आदिवासी पाडे येथे समुपदेशन प्रारंभ करण्यात आले.
               खालापूर तालुक्यातील चावणी,आदिवासी वाडी येथून प्रारंभ करण्यात आला.यावेळी ॲड.जयेश तावडे यांनी कायद्याच्या माध्यमातून येणारे समस्या विषद केल्या तर इशिका शेलार यांनी शिक्षण न घेतल्याने येणाऱ्या समस्या मांडून त्यावर निराकरण करण्यासाठी उपाय सांगताना खालापूरचे उप निरिक्षक शिवाजी धुंदरे यांनी कमी वयात लग्न केल्याने गुन्हा दाखल झाल्याने आयुष्यात येणारे संकट मांडताना नागरिकांनी जागृत राहण्याची गरज असल्याचे सांगितले.
          या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहज सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे,कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी,उपाध्यक्षा इशीका शेलार,सचिव अखिलेश पाटील,खजिनदार संतोष गायकर,महिला संघटक निलम पाटील,जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी, खालापूर तालुका प्रमुख मोहन केदार,मार्गदर्शक राजेंद्र फक्के,सल्लागार नरेंद्र हर्डीकर,गणेश राक्षे,दिवेश राठोड,उबेद पटेल, आश्पाक लोगडे यांनी अथक परिश्रम घेतले .
                    या उपक्रमासाठी खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक मिलिंद खोपडे, गोपनीयचे समिर पवार,संदेश कावजी, चावणीचे सरपंच बाबू आखाडे,पोलीस पाटील समिर पाटील,गणेश चव्हाण,आतिष पाटील,संतोष जाधव,नरेश पाताडे,कृष्णा वाघमारे यांचे विशेष सहकार्य लाभले.या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार नरेंद्र हर्डीकर यांनी मानले.
              आदिवासी समाजामध्ये कमी वयात होणाऱ्या लग्नामुळे होणारे संभाव्य धोके समजावून सांगणे गरजेचे आहे.जनजागृतीच्या माध्यमातून तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर प्रबोधनाची सुरुवात केल्याने समाजास नक्कीच चालना मिळेल असा आशावाद ॲड.जयेश तावडे यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर