धैर्य आणी कृपा जिवनाश्यक घटक आहे. ह.भ.प.रामदास भाई महाराज पाटील

  धैर्य आणी कृपा जिवनाश्यक घटक आहे. ह.भ.प.रामदास भाई महाराज पाटील 





पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
माजगांव /आंबिवली : १४ मार्च,

             जिवन जगत असतांना जिवणांच्या गरजा वेगवेगळ्या असतात.मात्र आज मानसाच्या मध्ये भिती निर्माण होत असून,चिंतेने माणूस खचत चालले आहे.मात्र हिरकणी हिच्या कडे भिती नव्हती म्हणून ती गडावरुन आपल्या बाळासाठी खाली उतरली आणी त्यास गडाला हिरकणी बुरुज नाव पडले.दिवसातून हजारो पाय-या चड उतार करत होती. जिवनामध्ये धैर्य आणी भगवंताची कृपा असल्यामुळे हे सर्व शक्य होत असते.असे मत ह.भ.प.रामदास भाई महाराज पाटील दिपोत्सवाच्या किर्तनाच्या माध्यमातून व्यक्त या किर्तनांचे सेवासौजन्य मंगेश पाटील आणी पत्रकार काशिनाथ जाधव यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.
           अखंड हरिनाम उत्सव आंबिवली येथे अखंड  ज्ञान,जप यज्ञ, हरिपाठ,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा,विठ्ठल रखुमाई मंदिर येथे दिपोत्सवाच्या माध्यमातून आज सांगता करण्यात आली.तसेच गावातून पायी दिंडी काढण्यांत आली.यावेळी या पंचक्रोशितील ग्रामस्थ,वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ह्या सोहळ्यांचे ४१ वर्ष असून रोज नित्यनेमाने काकडा,भजन,प्रवचन सामुदायिक पारायण,तसेच किर्तनांचे आयोजन करण्यात येत होते.
           

             यावेळी ते पुढे म्हणाले की संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद गायले कारण त्यांस स्पर्शातून सामर्थ मिळाले होते. जिवनांत कृपा आणी सामर्थ्य,अशिर्वाद देव देवू शकतात.जिवनात तुलना महत्वांची आहे. कारण आपल्या ताटात आलेल्या अन्नाला उत्तम म्हणणे,हिच संस्कृती असून हाच अन्नांचा सन्मान आहे. व्यवहारी जिवनात टेंशन मानसाला असून तोच श्रीमंत आहे.पण समाधानी नाही ही शोकांतिका आहे.सुखासाठी माणूस सातत्याने धावत असतो.मुंगी,पशू,पक्षी,स्वताला लागेल तेवढेच धान्य वेचत असतात.मात्र माणूस स्वताच विचार करीत असतो.म्हणून तो समाधानी नाही.
             जिवनात रक्ताची नाती जमिनदोस्त होत चालली आहे.वेळेची मर्यादा खुंटत चालली आहे.त्याच बरोबर वाचन संस्कृती विसरत चालली आहे.वृत्तपत्रे वाचन केल्यांस आपणांस जिल्हासह राज्यातील घडामोडी समजत असतात.आणी एखादि बातमी लिहीत असतांना शब्दांची जुळवणी योग्य प्रकारे करुन आपणा पर्यंत पोहचविण्यांचे काम पत्रकार करीत असतो.असे मत दिपोत्सवांच्या किर्तनांच्या माध्यमातून व्यक्त केले.


Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण