खालापूर नगरपंचायत स्वच्छतेचे वाजले तीन तेरा
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
खालापूर : १६ मार्च,
स्वच्छता जेथे लक्ष्मी नांदे तेथे असे अनेक प्रकारचे वाक्य अनेक अनेक भिंतीवर किंवा सुविचार फळयावर पाहावयांस मिळते तर गाव पातळीवर घरांच्या भिंतीवर सुद्धा असते.मात्र असे असले तरी सुद्धा गेली चार दिवस खालापूर नगरपंचायत सफाई कर्मचारी व घंटागाडी खालापूर शहरात दिसेनासी झाली असल्यामुळे जागोजागी कचरा साचला असल्यांचे पहावयांस मिळत आहे.या भोंगळ कारभाराविषयी ग्रामस्थांच्या मध्ये नाराजीचा सुर उमठत आहे.
अधिक माहिती घेतल्यावर असे समजले की गेली दोन महिने सफाई कर्मचारी व घंटागाडी चालक यांचा नगरपंचायत चा ठेकेदार याने वेतन न केल्यामुळे कामगारांनी कामावर न येण्याचा निर्णय घेतला आहे.खालापूर नगर पंचायत मधील ठेकेदार हे नक्की कोण आहेत, हा मोठा प्रश्न नागरिकांना पडला आहे?खालापूर शहर आधीच समस्यानी बेजार असून त्यात चार दिवस घंटागाडी न आल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
एकीकडे भिंतीवर उत्तम असे सुविचार लिहून नागरिकांमध्ये स्वच्छतेचा संदेश दिला जात असतांना प्रत्येक्षात नागरिकांच्या घरा बाहेर कचरा कुंडीत कचरा जमा झालेला पाहावयांस मिळत आहे.शहरात सर्व ठिकाणी कचरा पडलेला दिसत असून मोठया प्रमाणात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना या उग्र वासाचा त्रास सहन करावा लागत आहे.तसेच नगरपंचायत मुख्याधिकारी ह्या कार्यालयात हजर नसतानां असे दिसून येत असून लोकप्रतिनिधी काय करतात हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
0 Comments