स्थानिकांना नोकरीत समाविष्ट करण्यासाठी केन कॉस्मेस्युटीक्लस प्रा.लि.कंपनी समोर दुसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरुच
पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे
खालापूर : १६ मार्च,
खालापूर तालुक्यातील होराळे ग्रामपंचायत हद्दीत होत असलेल्या केन कॉस्मेस्युटीक्लस प्रा.लि.कंपनी प्रशासनाच्या नवीन प्रोजेक्टमधील उद्योग व्यवसायात येथील स्थानिकांना डावलून बाहेरील नोकर भरती करीत असल्याने होराळे, परखंदे, झाडाणी येथील संतप्त झालेले स्थानिक ग्रामस्थ कंपनी प्रशासनाच्या विरोधात एकवटले असून जोपर्यंत स्थानिकांना उद्योग व्यवसायामध्ये हक्काचा रोजगार मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील या अनुषंगाने होराळे, परखंदे, झाडाणी येथील स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन 'शिवस्वराज्य संघर्ष समिती ' स्थापन केली आहे.
होराळे ग्रामपंचायत हद्दीत नव्याने होत असलेल्या
केन कॉस्मेस्युटीक्लस प्रा.लि.कंपनी प्रशासनाकडून येथील स्थानिकांना रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतू या कंपनीने देण्यात आलेले आश्वासन न पाळल्याने होराळे, परखंदे, झाडाणी येथील स्थानिकांना आपल्या न्यायहक्कासाठी आमरण उपोषणाला बसावे लागले आहे. सर्व स्थानिकांना नोकरीत प्रथम प्राधान्य तसेच कामगार कंपनी मार्फत कायमस्वरूपी असावेत, कंपनीला लागणारी साधनसामग्री ग्रामपंचायत हद्दीतील असावी, कुशल/ अकुशल शैक्षणिक पात्रतेनुसार स्थानिकांना व्यवसाय मिळावा, मालवाहतुकीसाठी लागणारे ट्रक टेम्पो, बस अशी वाहने देखील होराळे ग्रामपंचायत हद्दीतील असावीत.
अशा मागण्या शिवराज्य संघर्ष समितीकडून करण्यात आल्या आहेत.त्या समितीमार्फत अंकुश मोरे, कल्पेश पाटील, नागेश पाटील, काशिनाथ भोईर, गणेश मोरे, जगदीश कांबळे हे काल पासून आमरण उपोषणाला बसले असून दुसऱ्या दिवशीही हे उपोषण चालू. आहे ,या उपोषणाला स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ग्रामपंचायत सदस्या सुरेखा दळवी, अविनाश बुरुमकर , अर्पिता पाटील, रवी मोरे, मिलिंद मोरे, अंकुश शेलार, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याबाबत कंपनी व्यवस्थापनाची बाजू ऐकून घेण्यासाठी गेटवर पत्रकार गेले असता कंपनीचे व्यवस्थापक संदीप पटेल यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले असल्याने कंपनीची बाजू समजू शकली नाही मात्र कंपनीच्या व्यवस्थापकांनी पत्रकारांना गेट समोरून जाण्यास सांगितले यावरून कंपनी व्यवस्थापक मुजोर असल्याचे दिसून येत असल्याचे दिसून आले.
0 Comments