मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर उपक्रमात राजिप शाळा वडगांव तालुक्यात तृतीय क्रमांक
काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : १६ मार्च,
रायगड जिल्हा परिषद शाळा वडगांव या शाळेमध्ये अमुलाग्र बदल घडविण्यांत आले असून संपुर्ण भिंती या विद्यार्थ्यांच्या आभ्यासांने रंगवून गेल्यांचे पहावयांस मिळत आहे.त्यांस बरोबर या शाळेचे पट संख्या सुद्धा वाढले असून या ठिकाणी विद्यार्थ्यांना आभ्यास व्यतिरिक्त विविध उपक्रम हाती घेतले जात आहे.भाजीपाळा लागवड कंपोस्ट खत,शुद्ध पाणी,सांस्कृतीक कार्यक्रम अदि या ठिकाणी घेतले जात असतांना मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमात तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाल्यामुळे मुख्याध्यापक सुभाष राठोड यांचे कौतुक करण्यात आले.
तसेच दर महिन्याला होत असलेली शिक्षण परिषद शाळा वडगांव येथे घेण्यांत आली.शाळेची होत असलेली प्रगती तसेच शिक्षकांची,आणी कमिटी यांची मेहनत अतुलनीय असल्यामुळे येथिल शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी उपस्थित शिक्षक यांनी शालेय कमिटी शिक्षक यांचे आभार व्यक्त केले.त्याच बरोबर शालेमध्ये होत असलेल्या उपक्रमांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी
या शिक्षण परिषद आणी शाळेचा परिसर पाहण्यासाठी आलेल्या केंद्रप्रमुख केंद्र - जे पी परदेशी,खोपोली - प्रा.डॉ.सागर ससाणे,मुख्याध्यापक - किरण कवाद,भूषण पिंगळे,दीपक अकोलकर,मस्तान बोरगे,त्याच बरोबर अध्यक्ष - करुणा ठोंबरे, उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती-राजश्री जांभूळकर,स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी - गौरी महादेव गडगे,शिक्षक - वैजनाथ जयसिंग जाधव सरस्वती कवाद ,निकिता रघुनाथ गडगे स्वयं सेविका,साक्षी रामदास जांभूळकर, स्वयं सेविका अदि या उपक्रमास सहभागी होते.

यावेळी वाशिवली ठाकूरवाडी शालेय गुणवत्ता तर वडगाव शाळा क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी,केल्याबद्द्ल,सन्मापत्र देवून सन्मानित करण्यात आले. रायगड जिल्हा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फे वैजनाथ जाधव शिक्षक यांना आदर्श पुरस्कार मिळाल्यामुळे सन्मान करण्यात आले.
0 Comments