पोलीस पाटील संघाकडून आ.महेंद्र थोरवेंचे मानले आभार

 पोलीस पाटील संघाकडून आ.महेंद्र थोरवेंचे मानले आभार.



पाताळगंगा न्युज : दिनेश पाटील
साजगाव : १७ मार्च,

       दोन वेळा हिवाळी अधिवेशनात आंदोलन तर आझाद मैदानात तीन दिवस लाक्षणिक उपोषण केल्यानंतर पोलीस पाटील संघाच्या मागणीचा विचार करीत राज्य शासनाने बजेटमध्ये मानधन वाढीचा विषय घेत पोलीस पाटीलांच्या मानधनात भरगोस अशी वाढ केल्याने पोलीस पाटील संघाकडून राज्य शासनाकडे आपली बाजू मांडल्याने कर्जत खालापूरचे आ.महेंद्र थोरवे यांचे पुष्पगुछ देऊन आभार मानले.
                  पोलीस पाटील हा समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा घटक आहे.गावातीन विविध समाजाला बांधून ठेवत कोणतेही वाद होऊ नये याची काळजी घेत सांभाळणार समाजातील महत्वाचा घटक आहे.मात्र त्यांना आपल जिवन जगण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.दिवस असो वा रात्र त्यांना गावासाठी तत्पर रहावे लागत असल्याने ते कुठेही नोकरी करू शकत नाही.त्यामुळे उदरनिर्वाहाच हेच साधन त्यांच्याकडे असल्याने मिळणाऱ्या मानधनात ते आपला घरगाडा चालवीत असे.
            महाघाई ने उचांक गाठल्याने कुटुंब चालविताना त्यांना कठीण होऊन बसले आहे. महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने राज्यध्यक्ष बाळासाहेब शिंदे,राज्यसचिव कमलाकर मांगले आणि राज्य सहसचिव डी.एस.कांबळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर मोर्चे तसेच आंदोलणे करण्यात आळी.यामध्ये सलग दोन वर्षे नागपूर येथे झालेल्या हिवाळी आधिवेशनात आंदोलन तर आझाद मैदान येथे तीन दिवसांचे लाक्षणिक उपोषणही करण्यात आले,तसेच राज्यातील आमदार आणि खासदारांना  मानधन वाढी संदर्भात निवेदनही देण्यात आले असून आपली बाजू राज्य शासनाकडे मांडावी यासाठी विंनतीही कारण्यात आली होती.
               राज्य शासना बरोबर लढा देत असताना याच महिन्यात राज्यशासनाकडुन मांडण्यात आलेल्या बजेटमध्ये राज्यातील  पोलीस पाटीलांच्या मानधनात वाढ करीत ती वाढ साडे सहा हजाराहून भरगोस अशी तब्बल पंधरा हजार करण्यात आली.त्यामुळे आपल्या कुटुंबाचा चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह करता येईल अश्या भावानेतून पोलीस पाटीलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.आपली बाजू शासनाकडे लावून धरत आज आपल्याला न्याय देत आपला चांगल्या प्रकारे विचार करीत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या सदस्यांनी कर्जत खालापूरचे आ.महेंद्र थोरवे यांचे त्यांच्या कार्यलयात जाऊन भेट घेऊन केलेल्या सहकार्याबद्दल पुष्पगुछ देऊन आभार मानले.
                 तसेच निवृत्तीचे वय ६५  वर्षे करावे आणि नूतनिकरण बंद करावे अश्या मागणीचे निवेदनही देण्यात आले.यावेळी आपल्या पोलीस पाटीलांना राज्य शासनाकडून भरगोस अशी मानधन वाढ करण्यात आल्याने त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होतील.तसेच कोणत्याही अमिषाला बळी पडणार नाहीत आणि आपली पाटीलकीची जबाबदारी पार पाडू शकेल. आम्हाला या लढ्यात सर्व आमदार खासदार यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले.आ महेंद्र थोरवेंणी आमची चांगली बाजू शासनाकडे मांडळी आणि मानधन वाढीसाठी ते आग्रही होते.
           आमच्या व्यथा त्यांच्या लक्षात आल्याने चांगल्या प्रकारे पाठपूरावा करीत आम्हाला न्याय देणाऱ्या आश्या कार्यसम्राट आमदारांचे आभार मानने हे आमचे कर्तव्य आहे असे वक्तव्य महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे उपजिल्हाध्यक्ष दिनेश पाटील यांनी यावेळी केले.हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी तसेच आमदारांचे आभार माणण्यासाठी खालापूर तालुका अध्यक्ष अनंत ठोंबरे,सचिव पंकज देशमुख,कर्जत तालुका अध्यक्ष मधुकर डायरे यांसह मोठ्या संख्येने पोलीस पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण