ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या राज्य कार्यकारणी सदस्य पदी संतोष घाटे
पाताळगंगा : दत्तात्रय शेडगे
खालापूर : १८ मार्च ,
ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य पदी युवा नेते संतोष झिमा घाटे यांची नुकतीच निवड करण्यात आली,
राज्यातील धनगर समाजासाठी अहोरात्र झटणारी , समाजाच्या अडी अडचनित नेहमी अग्रेसर असणारी, खेडेपाड्यातील मुलांची शैक्षणिक प्रगती झाली तर भविष्यात झाली तर येणारी पिढी सुधारून समाजाची प्रगती होईल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ऑल इंडिया धनगर समाजाचे प्रदेशाध्यक्ष प्रविणजी काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात हा महासंघ काम करत आहे,
खालापूर तालुक्यातील खडई या गावचे युवा नेत्रुत्व, शांत, संयमी आणि समाजाच्या अडचणीत नेहमी अग्रेसर असणारे युवा नेतृत्व संतोष झिमा घाटे यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या राज्य कार्यकरिणी सदस्य पदी निवड करण्यात आली , त्यांच्या निवडीने रायगड जिल्हासह खालापूर तालुक्यातील धनगर समाजात आनंदाचे वातावरण पसरले असून सर्वच स्तरातून त्यांच्या अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत,
0 Comments