राजिप शाळा वडगाव ने राबविला स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती अभियान

 राजिप शाळा वडगाव ने राबविला स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती अभियान




पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
वडगाव : १९ मार्च,

            शाळेय शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांना मतदानांचे महत्व कळावे या उद्दात विचारांतून रायगड जिल्हा परिषद शाळा वडगांव येथिल मुख्याध्यापक सुभाष राठोड आणी शिक्षक यांच्या माध्यमातून स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती अभियान राबविण्यांत आले.मतदानाच्या दिवशी सुट्टी म्हणून बाहेर फिरायला ना जाता,घरी न थांबता मतदान करावे,असे भावनिक साद आई,बाबा,आजोबा,आजी,काकू भाऊ,ताई यांना देण्यांत आली.यावेळी गावातील विद्यार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देऊन कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला.

              यावेळी या कार्यक्रमात शाळेय मंत्रिमंडळ म्हणून मुख्यमंत्री मंथन ठोंबरे,उप मुख्यमंत्री,हर्ष एकनाथ गडगे व महसूल व निवडणूक मंत्री आर्या रविंद्र कोंडीलकर यांच्या नेतृत्त्वाखाली गावात स्वीप कार्यक्रमांतर्गत नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी (रोहयो) जिल्हा रायगड यांच्या आदेशानुसार व गटशिक्षणाधिकारी खालापूर कैलास चोरामले यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी शासना कडून प्रसिद्ध पत्र वाचन करण्यांत आले.
         

       शासनाच्या या अभियानात तालुक्यात सर्वप्रथम अभियान राबवून शासनाच्या धोरणाच्या अंमलबजावणीत तत्परता दाखविल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यांत आले. यावेळेस  विषय शिक्षिका सरस्वती कवाद, सह शिक्षक वैजनाथ जाधव व स्वयं सेविका निकिता गडगे व साक्षी जांभूळकर यांनी मेहनत घेतली,यावेळी गावातील जेष्ठ नागरिक व पालक ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या या अभियानाचे कौतुक केले.
                 


Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण