प्रेमाणे जोपासलेली माणसे ही आपली खरी श्रीमंती ह.भ.प.दिलीप महाराज राणे
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
तळवली : २२ मार्च,
जिवनात विचारांने केलेला परमार्थ माणसांची बुद्धी आणी संसार उत्तम चालत असतो.मात्र भगवंतांनी हा देह भजन करण्यासाठी दिला आहे.मात्र संसार हे नाम मात्र आहे.गळ्यात तुळशीची माल आणी अंगणात तुळस ही वारकरी यांची ओळख आहे.मात्र त्यांची अहवेळना करु नये.जिवनात भेटेल त्या व्यक्तीशी दोन मिनिटे उभे राहून विचारपुस केल्यांस त्यास समाधान वाटते.डोक्यावर संसाराचा भार असला तरी किर्तनात टाळ गळ्यात गालून त्यांचा नाद झाल्यांस मन हळके होते असते.संतानी किर्तने केली ती मानवांचा उद्धारासाठी,मात्र प्रत्येकांनी जिवनांत माणसे जोपायसला शिका कारण हिच खरी श्रीमंती आहे.
असे मत काल्यांच्या किर्तनात तळवली येथे ह.भ.प. दिलीप महाराज राणे यांनी काल्यांच्या किर्तनाच्या माध्यमातून व्यक्त या किर्तनांचे सेवासौजन्य महेंद्र सुदाम मालकर (अध्यक्ष : स्वराज्य संघटना ) यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.श्री पांडुरंग कृपेने संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या कृपा आशिर्वादाने व परमपुज्य आदरणीय गुरुवर्य ह.भ.प. दादा महाराज राणे (हालिवली) यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच किर्तन प्रवचन सुरु होते.या सप्ताहाच्या निमित्ताने मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा, त्यास बरोबर काल्याचा महा प्रसाद या मंदिराचे बांधकाम आणी रंगरगोटी अदित्य बिर्ला या कंपनीने केले.
काल दिपोत्सवाच्या माध्यमातून या अखंड हरिनामाची सांगता करण्यांत आली. यावेळी या परिसरातील शेकडो वारकरी मान्यवर उपस्थित होते.त्याच बरोबर या ठिकाणी अखंड ज्ञान,जप यज्ञ, हरिपाठ,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा,विठ्ठल रखुमाई मंदिर येथे दिपोत्सवाच्या माध्यमातून आज सांगता करण्यात आली.तसेच गावातून पायी दिंडी काढण्यांत आली.यावेळी या पंचक्रोशितील ग्रामस्थ,वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोज नित्यनेमाने काकडा,भजन,प्रवचन सामुदायिक पारायण,तसेच किर्तनांचे आयोजन करण्यात येत होते.या सप्ताहाचे आयोजन ग्रामस्थ मंडळ,महिला मंडळ,तरुण वर्ग यांच्या माध्यमातून करण्यांत आले.
0 Comments