धनगर समाजाचे नेते प्रवीण काकडे शनिवारी खालापूरात,जनजागृती मेळाव्याचे आयोजन ...
पाताळगंगा न्युज : दत्तात्रेय शेडगे
खालापूर : २२ मार्च,
ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा धनगर समाजाचे नेते प्रवीण काकडे हे शनीवारी खालापूरात येणार असून यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ आणि जनजागृती मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत,
ऑल इंडिया धनगर महासंघ रायगड यांच्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला असून या जनजागृती मेळावा शनिवार २३मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता एल एस फार्म गोलेवाडी ता खालापूर येथे आयोजित करण्यात आला आहे,
यावेळी ऑल इंडिया धनगर महासंघाचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, तसेच जनजागृती मेळाव्याला प्रवीण काकडे मार्गदर्शन करणार आहेत, तरी या मेळाव्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ऑल इंडिया धनगर महासंघाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष घाटे आणि रायगड जिल्हा अध्यक्ष प्रकाश उघडे यांनी केले
0 Comments