रायगड जिल्ह्यातील धनगर समाज आजही सुविधांपासून वंचित , राज्यकर्त्यांनी समाजाचा केला फक्त वापर - प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे

 रायगड  जिल्ह्यातील धनगर समाज आजही सुविधांपासून वंचित , राज्यकर्त्यांनी समाजाचा केला फक्त  वापर - प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे 

       



पाताळगंगा न्युज :  दत्तात्रय शेडगे 
खालापूर : २४ मार्च,

                 कोकण आणि रायगड जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वाड्या वस्त्या आजही  मूलभूत सुविधांपासून वंचित असून राज्यकर्त्यांनी फक्त समाजाचा मतदाना पुरता वापर केला असून समाजाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केला आहे 
   ते आयोजित खालापूर (गोळेवाडी  )येतील जनजागृती मेळाव्यात बोलत होते, 
              ऑल इंडिया धनागर समाजाच्या माध्यमातून  युवकांना एकत्र करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही संघटना अहोरात्र मेहनत घेत असून समाजातील मुले मुली शिकल्या तर समाजाची शैक्षणिक प्रगती बरोबर आर्थिक प्रगती होईल, कोकणासह रायगड जिल्ह्यातील खालापूर, कर्जत तालुक्यातील धनगर  समाजाच्या वाड्या वस्त्यांवर आजही रस्ता वीज आणि पाण्याची सोय नाही, नुकताच देशाला स्वातंत्र्य मिळून एकीकडे ७५ वर्ष पूर्ण झाल्याचे अमृत महोत्सव साजरा केला परंतु आमच्या समाजाचा आजही विकास झाला नसून आमचा समाज शिक्षणापासून वंचित आहे, 
               ७५ वर्षापासून धनगर आरक्षणाचा प्रश्न आजही तसाच असून राज्यकर्त्यांनी फक्त धनगर समाजाचा मता पुरता वापर केला असून लोकसभेची निवडणूक जाहीर झाली असल्याने समाजाने आतातरी शहाणे होऊन समाजाचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून समाजाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा जेणेकरून राजकीय पक्षाला आपल्या समाजाची ताकद कळून ते आपली दखल घेतली असेही आवाहन प्रवीण काकडे यांनी समाजाला केले आहे,
           यावेळी ऑल इंडिया धनगर महासंघ कार्यकारिणी सदस्य संतोष घाटे, रायगड जिल्हाध्यक्ष प्रकाश उघडे, उपाध्यक्ष  सुनील कोकळे डॉ राजाराम हुलवान, मारुती गोरड, अनंता हिरवे, माजी अध्यक्ष आनंदराव कचरे, रामचंद्र पुकळे, ओमकार कुचेकर, कळंबोली शहर अध्यक्ष अरुणा दडस, माजी सरपंच खालापूर तालुका अध्यक्ष किरण हिरवे , महादेव कारंडे, नथुराम ढेबे, बाळकृष्ण आखाडे, विठ्ठल जांगळे, नरेश आखाडे, गणेश बावदाने, मंगेश बावदाने, प्रकाश बुरगले, सतीश बंडगर, आशिष स्वामी, प्रफुल्ल जंगम, संजकुमार गोरड सुरेश घाटे महादेव घाटे, आदिसह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण