ऑल इंडिया धनगर महासंघ रायगडची कार्यकारिणी जाहीर,जिल्हाध्यक्षपदी प्रकाश उघडे रायगडकर,तर उपाध्यक्षपदी सुनील कोकळे
पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे
खालापूर : २४ मार्च,
ऑल इंडिया धनगर महासंघ रायगडची कार्यकारिणी जाहीर झाली रायगड जिल्हाध्यक्ष पदी प्रकाश उघडे तर उपाध्यक्ष पदी सुनील दादू कोकले यांची नुकतीच निवड करण्यात आली,
महाराष्ट्रात धनगर समाजातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी दऱ्याखोऱ्यात जाऊन मुलांना शिक्षणाचे महत्व पटवून देवून समाजात शिक्षणाची क्रांती घडवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे हे अहोरात्र मेहनत घेत असून गोर गरीब वंचित मुलांना दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी मेहनत घेत आहेत,
रायगड जिल्ह्यातही शिक्षणाची क्रांती घडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न करीत असून नवीन कार्यकारणीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहेत, यासाठी त्यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे,
ऑल इंडिया धनगर समाज महासंघ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य पदी संतोष झिमा घाटे, डॉ राजाराम हुलवान, मारुती गोरड, महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सचिव पदी अरुणा अण्णासाहेब वावरे,रायगड जिल्हाध्यक्ष पदी प्रकाश भागू उघडे रायगडकर, उपाध्यक्ष पदी सुनील दादू कोकळे, प्रभारी रायगड जिल्हा अध्यक्षपदी, आनंदराव कचरे खालापूर तालुका अध्यक्ष पदी किरण हिरवे , सुधागड तालुका अध्यक्ष गणेश ( बापू)बावदाने यांची नुकतीच निवड करण्यात आली, त्यांना नियुक्ती पत्रक प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या हस्ते देण्यात आले, तर काकडे यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
0 Comments