खालापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन,विविध मागण्यांचे दिले निवेदन....

 खालापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन,विविध मागण्यांचे दिले निवेदन....




पाताळगंगा न्युज :  दत्तात्रय शेडगे
खालापूर : २३ मार्च,

                अखिल भारतीय खालापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने खालापूरचे गटशिक्षण अधिकारी  कैलास चोरमाले यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले, 
             या निवेदनात सन २०२३-२४ च्या संकलित मूल्यमापन २ तसेच इयत्ता ५ वी व ८ वीच्या वार्षिक परीक्षेचे आयोजन वेळापत्रकानुसार दुपार सत्रात करण्यात आले आहे परंतु उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दोन्ही परीक्षा सकाळ सत्रात घेऊन सर्व विद्यार्थ्यांची उन्हाच्या तीव्रते पासून मुक्तता करावी  मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने निवेदनाद्वारे  गटशिक्षण अधिकारी कैलास चोरमाले, यांना देण्यात आले.यावेळी विविध विषयांच्यावर चर्चा करण्यांत आली असून गटशिक्षणाधिकारी ह्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
             त्यावेळी महाराष्ट्र राज्य प्रथिमक शिक्षक संघ खालापूर तालुका अध्यक्ष संदीप जाधव,सरचिटणीस दीपक पालकर, ज्येष्ठ सल्लागार संतोष पाटील, कार्याध्यक्ष मारुती दासरे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन कडू, संदीप सुर्वे, समन्वयक कांचन कडू, जयश्री सुर्वे , केंद्र प्रतिनिधी शहाजी घायतिडक आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर