रा.जि.प.शाळा वडगाव ने साजरी केली प्लॅस्टिक मुक्तीची होळी
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
वडगांव : २४ मार्च,
रायगड जिल्हा परिषद शाळा वडगाव येथे भारतीय परंपरेनुसार प्रत्येक सण साजरे केले जाते.मात्र होळी या सणांचे औचित्य साधून होळी लावण्यांत आली.मात्र ही होळी लाकडे,पेंढा यांची नसून प्लॅस्टिक च्या पिशव्या अन्य वस्तू जाळून होळी लावण्यांत आली.यासाठी विद्यार्थ्यांनी व शिक्षक यांनी गावातून प्रभात फेरी काढून संपुर्ण गावातील प्लॅस्टिक एकत्र करुन होळी करण्यांत आली.यावेळी त्यांच्या हातात फळक तसेच घोष वाक्यांनी हा परिसर गर्जून गेल्यांचे पहावयांस मिळाले.
तसेच दुस-या दिवशी धुळवड असल्यामुळे रासायनिक रंग न वापरता निसर्गातील नैसर्गिक रंगाच्या वापर करुन धुळीवड साजरी करण्यांत आली.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाल्यांचे पहावयांस मिळाले.यावेळी मुख्याध्यापक सुभाष राठोड यांनी रासायनिक रंगाचा शारिरिक दुष्परिणाम प्लॅस्टिक पर्यावरणांस असणारा घातक यांचे महत्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले, वैजनाथ जाधव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.होळी सणासाठी विषय शिक्षिका सरस्वती कवाद, स्वयंसेवीका निकिता गडगे,साक्षी जांभूळकर तसेच अंगणवाडी सेविका नीता राऊत,सुभद्रा ठोंबरे,स्वयंपाकी हौसाबाई गडगे यांनी या उपक्रमास योगदान दिले.
चौकट
प्लॅस्टिक च्या वापरातून होणारे दुष्परिणाम शालेय वयातूनच मुलांना समजले तर,भविष्यात याबाबत मुले गंभीरपणे विचार करतील.या उद्देशाने ही प्लॅस्टिक मुक्तीची होळी साजरी केली ( सुभाष राठोड, मुख्याध्यापक रा.जि.प.शाळा,वडगाव)
0 Comments