राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांचा आमदार थोरवे यांना इशारा

 राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचा कडेलोट करणार असाल तर आम्हीही तुम्हाला हत्तीच्या पायाखाली दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही,राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांचा आमदार थोरवे यांना इशारा 



पाताळगंगा न्युज :  दत्तात्रय शेडगे                               खालापूर : २५ मार्च,

                 पेण येथील शिवसेनेच्या कार्यक्रमात कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे  यांच्यावर जहरी टीका करून  तटकरे यांचा कडेलोट करू , अशी टीका केली होती.ही टीका राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या चांगलीच जिव्हारी लागली असून राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी आमदार थोरवेना जोरदार प्रतीउत्तर दिले आहे, सुनील तटकरे यांचा तुम्ही कडेलोट करणार असाल तर आम्हीही तुम्हाला हत्तीच्या पायाखाली तुडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी आमदार थोरवे यांना  दिला आहे.                                                          कोकणात शिमग्याचा सन चालू असताना कर्जत खालापूर मतदासंघांत  राजकीय शिमगा पाहायला मिळत असून या मतदासंघातील संघात राजकीय वातावरण तापले आहे,ऐन लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने आमदार थोरवेनी केलेल्या टीकेने महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाराज झाल्याचे दिसून येत आहेत,जर वारंवार तटकरे यांच्यावर आमदार थोरवे तोंडसुख घेत असतील तर ही युती काय कामाची असाही प्रश्न सुधाकर घारे यांनी उपस्थित केला आहे.                                                   मावळ लोकसभा  मतदार संघापैकी मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे सुनील शेळके आमदार आहेत, तर कर्जत खालापूर मतदार संघात राष्ट्रवादीचीही प्रचंड ताकद आहे, हेही  आमदार थोरवे यांनी लक्षात ठेवावे  असाही इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे, जर सुनील तटकरे यांचा तुम्ही कडेलोट करणार असाल तर आम्ही देखील तुम्हाला हत्तीच्या पायाखाली तुडवल्या शिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा थोरवे यांना राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर