मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजिप शाळा माजगांव येथे विद्यार्थ्यांना खावू वाटप

 

मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजिप शाळा माजगांव येथे विद्यार्थ्यांना खावू वाटप 


पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
माजगांव : २७ मार्च,

                आज प्रत्येक जण वाढ दिवस वेगवेगळ्या दृष्टीकोणांतून साजरा करीत असतो.मात्र काही व्यक्ती असे आहेत की, आपला वाढदिवस साजरा गोर - गरीब किंवा शाळकरी मुलांच्या मध्ये काही भेट वस्तू देवून साजरा केला जातो.माजगांव येथिल असलेले सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढवाळकर यांच्या मुलगा आद्य याचा  वाढदिवसाच्या निमित्ताने रायगड जिल्हा परिषद शाळा माजगांव येथे विद्यार्थ्यांना खावू वाटप करण्यात आला.                             

               वर्षातून एकदाच येणारा आपला वाढदिवस हा कुठेही  न साजरा करता ज्या शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत आहे.त्या शाळेतील मुलांना काहीतरी द्यावे तसेच त्यांच्या मध्ये शाळेय विषयी आवड निर्माण व्हावी.त्यांनी विविध विषयायामध्ये उत्तम गुण मिळावे.त्याच्या मध्ये असलेली कलेला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या उद्दात विचारांतून हा दिवस त्यांच्या समवेत साजरा केला.

                बाजीराव ढवाळकर यांची शाळेय साठी असणारी तळमळ अतिषय प्रेरणादायी आहे.रणरणत्या उन्हात विद्यार्थ्यांना फॅन ची आवश्यकता आहे असे समजल्यानंतर स्वताच्या मुलांची असलेली मिनी बॅंक मधून दोन फॅन या शाळेला देण्यांत आले.यामुळे ढवाळकर यांचे सातत्याने या शाळेवर नित्यात प्रेम असल्यांचे दिसून येत आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने  त्यांच्या पत्नी वैशाली बाजीराव ढवाळकर,तसेच ग्राम पंचायत सदस्य - शशिकांत पाटील,रमाकांत पाटील,मुख्याध्यापक - किरण कवाद,रेखा जाधव, भूषण पिंगळे अदि उपस्थित होते.



 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर